Advertisement

बिरसा फायटर्स रिंगणात; पक्ष उमेदवारांत पोटदुखी व ठोकेदूखी


*आरक्षण व हक्कांवर गधा; पक्ष उमेदवारांची बघ्याची भूमिका*

*पक्षाचे उमेदवार कामे करत नाहीत म्हणून संघटना निवडणूक रिंगणात: सुशिलकुमार पावरा*

रत्नागिरी:राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आले तरी ते आदिवासींची कामे अजिबात करत नाहीत,म्हणून बिरसा फायटर्स या सामाजिक आदिवासी संघटनेने राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी 10 उमेदवार रिंगणात उतरवत आहे.वर्षानुमते प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आदिवासींचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला.पाणी,रस्ते,वीज,घर,जमीन, शिक्षण,बेरोजगारी,स्मशानभूमी या आदिवासींच्या मूलभूत हक्कांकडे दूर्लक्ष केले.अजूनही आमचा आदिवासी बांधव मरणाच्या जागेसाठी , स्मशानभूमीसाठी संघर्ष करतोय,पाणी पाहिजे म्हणून शासनाच्या दरबारी निवेदन देऊन मागणी करतोय.जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरूणांना नोकरी दिली जात नाही.25 हजार पेक्षा जास्त मतदार असलेल्या आदिवासींना जिल्ह्यात पोटासाठी व पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. हे चित्र कुठेतरी बदलले पाहिजे.म्हणून आम्ही राजकीय क्षेत्रात आमचे उमेदवार उतरवत आहोत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
          राजकीय पक्षातून आमचे काही उमेदवार निवडून येतात, मात्र अज्ञात व पक्ष बंधनामुळे आदिवासींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. काहींना अजूनही आदिवासींच्या हक्क व अधिकार यांची जाणीव नाही.आदिवासींच्या मूलभूत अधिकारांवर गधा येते तरी बघ्याची भूमिका बजावतात. अशामुळे आदिवासी समाजापेक्षा त्यांना आपला पक्ष महत्वाचा वाटतो.
                     बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे हर्णे पंचायत समिती गटातून चंद्रभागा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.चंद्रभागा पवार ह्या विद्यमान कुडावळे ग्रामपंचायत सदस्या आहेत.आदिवासी महिला उमेदवार चंद्रभागा पवार,सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स व काही आदिवासी कार्यकर्त्यांनी स्थानिकांची भेट घेतली.बिरसा फायटर्स तर्फे निवडणूक रिंगणात 10 उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांत पोटदूखी व ठोकेदुखी सुरू झाली आहे.बिरसा फायटर्सने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
                    दापोली तालुक्यातील हर्णे,कुडावळे,केळशी ,पालगड हे 4 पंचायत समिती गट व पालगड,केळशी,हर्णे हे 3 जिल्हा परिषद गट ,असे दापोली तालुक्यातील एकूण 7 उमेदवार व खेड तालुक्यातील सुकिवली जिल्हा परिषद गट हा आदिवासी महिला राखीव जाहीर करण्यात आला आहे,म्हणून सुकिवलीतून आदिवासी महिला बिरसा फायटर्स तर्फे निवडणूक लढणार आहेत.त्याचबरोबर सुकिवली या पंचायत समिती गटात सुद्धा बिरसा फायटर्सचा उमेदवार राहणार आहेत,असे खेडमधून 2 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. मंडणगड तालुक्यातून कुंबळे या पंचायत समितीत गटातून 1 उमेदवार असे जिल्ह्यात एकूण 10 उमेदवार आम्ही उभे करणार आहेत,काही उमेदवार हे सर्वसाधारण गटातून लढणार आहेत, अशी घोषणा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी हर्णे येथे जाहीर केली.रत्नागिरी जिल्ह्यात आदिवासींचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही हे 10 उमेदवार उभे करणार आहोत,कुठल्याही राजकीय पक्षाची मदत न घेता आम्ही ही निवडणूक लढणार आहेत. आमचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, अशी मला खात्री आहे,235 शाखा असणा-या बिरसा फायटर्सचे राज्यभर उमेदवार उभे राहणार आहेत, अशीही माहिती पावरा यांनी यावेळी दिली.त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांत पोटदुखी व डोकेदुखी अशी दोन्ही सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments