Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करा: बिरसा फायटर्सची मागणी

विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण व रूग्णांच्या मोठ्या आजारांवर मोफत व जलद उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची गरज: सुशिलकुमार पावरा


रत्नागिरी: दापोलीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत व उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे संभाव्य पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
                     निवेदनात म्हटले आहे की,रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे ठिकाण हे जिल्हा ठिकाणापासून तब्बल 150 किलोमीटर अंतरावर आहे.दापोलीपासून जिल्ह्याच्या ठिकाणी रूग्णांना उपचारासाठी गाडीने न्यायला 6 तासपेक्षा अधिक वेळ लागतो. दापोली तालुक्यापासून 300 किलोमीटर अंतरावर कुठलेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही.दापोली व दापोली जवळच्या मंडणगड, खेड,गुहागर ,चिपळूण अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे पुणे, नाशिक,सिंधुदुर्ग अशा 500 -600 अंतरावर असणा-या शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते.तसेच अनेक रूग्णांना मोठ मोठ्या आजारांवर उपचारासाठी बाहेर गावी लांब अंतराच्या ठिकाणी जावे लागते. ब-याच इमरजन्सी प्रकरणातील रूग्ण हे रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे व पाहिजे ते उपचाराच्या सोयी नसल्यामुळे मरण पावले आहेत.तसेच मोठ्या खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च हा सर्वसामान्य व गरीब लोकांना परवडत नाही.
                   दापोलीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास तेथे रूग्णांना मोफत व कमी खर्चात उपचार घेता येतील.त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी लांब जावे लागणार नाही.तसेच यामुळे शासकीय रुग्णालयाचा ताण सुद्धा कमी होईल व जनतेला आरोग्याच्या सेवा सुरळीत मिळतील.रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतेच नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असले तरी दापोली व रत्नागिरी यातील अंतर हे जास्त आहे.त्यामुळे काही रूग्ण हे तेथे पोहचण्या अगोदरच दगावतील. वाढलेली लोकसंख्या,विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षण,मोठ्या आजारांच्या रुग्णांची गैरसोय,दापोली व रत्नागिरी यातील लांब अंतर इत्यादी गरज लक्षात घेऊन दापोली तालुक्यात नवीन शासकीय महाविद्यालय होणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून दापोलीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ मंजूर करून सुरू करावेत,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments