Advertisement

6000 खोके,विजयकुमार गावित OK

 *भ्रष्टाचारविरोधात आदिवासींचा नारा*

नंदूरबार:50 खोके एकदम ओके हा नारा देशभर चांगलाच गाजतो आहे.शिवसेनेच्या 40 भंडखोर आमदारांनी प्रत्येकी 50 खोके म्हणजेच 50 कोटी रूपये घेऊन महाराष्ट्राची सत्ता बदलली,असा उघड आरोप विरोधी पक्षांकडून व जनतेकडून केला जात आहे.बैल पोळाच्या दिवशी शेतक-यांनी चक्क 50 खोके एकदम ओके असे बैलावर पेंटींग करून सरकारचा विरोध दर्शवला.50 खोके माजलेत बोके,असाही नारा रस्त्यावर गिरवला जात आहे.50 बंडखोर आमदारांचा जोरदार विरोध सुरू असताना आता 6000 /कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांचा आदिवासी वाॅटसप ग्रुपवर, फेसबुक,सोशल मिडीयावर आदिवासींनी जोरदार विरोध सुरू आहे. 
                 6000/ कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना     
आदिवासी विकास मंत्री पद दिल्यास बिरसा फायटर्स राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला होता.या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्यासह राज्यातील 30 जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवली.सर्वाधिक निवेदन नंदुरबार जिल्ह्य़ातून पाठविण्यात आली.नंदूरबार जिल्ह्यातून विजयकुमार गावित यांना सर्वाधिक विरोध होत आहे.धडगांव ,अक्कलकुवा ,तळोदा,शहादा,नवापूर ,नंदुरबार इत्यादी तालुक्यातून तहसीलदार यांना प्रत्यक्षात व ईमेल द्वारे लाखो निवेदन पाठविण्यात आली.या प्रकरणात मंत्री विजयकुमार गावित यांना अटक होणारच, असा सुशिलकुमार पावरा यांचा विडीओ प्रचंड वायरल झाला. सोशल मिडीयावरील बातम्या व विडीओ बघून प्रकरणातील दोषी कंत्राटदार यांचे दाबे दणाणले.
         आदिवासींचे लूटारू,आदिवासींचे पैसे वापस करा,अशा घोषणा देत सुशिलकुमार पावरा यांनी विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचार घोटाळ्याच्या विरोधात दापोलीत उपोषण केले.भारतीय कम्युनिस्ट पक्ष व प्रहार या 2 पक्षांनी व सातपुडा बचाव आंदोलन, आदिवासी युवा बहुउद्देशीय संस्था यवतमाळ व पावरा समाज संघ महाराष्ट्र अशा 3 सामाजिक संघटनांनी बिरसा फायटर्स संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
          हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक व्यक्तींनी सुशिलकुमार पावरा सह अनेक पदाधिकाऱ्यांना फोन केले व मंत्री विजयकुमार गावित यांची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत.वारंवार फोन करूनही सुशिलकुमार पावरा हे मंत्री विजयकुमार गावित यांची तक्रार मागे घेत नाहीत,हे समजताच अनेक दलाल प्रकरण दाबण्यासाठी पुढे आले.त्यात दाज्या पावरा भाजपा सदस्य पंचायत समिती तळोदा यांच्यावर सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस ठाणे दापोलीत फौजदारी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दाज्या पावरा यांना सक्त ताकीद दिली आहे.दाज्या पावरा यांच्यासह केदार पाडवी यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी येथे सुद्धा सुशिलकुमार पावरा यांनी तक्रार दाखल केली.कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी पुढे येत असलेले दलाल नरमले.
           
            बिरसा फायटर्स संघटनेने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.तरीही विजयकुमार गावित यांना मंत्रीपदावरून हटविण्यात आले नाही. म्हणून बिरसा फायटर्स संघटना आंदोलनाची तयारीत आहे. बिरसा फायटर्सच्या सभेत आंदोलनाची तारीख ठरली आहे.त्यामुळे विजयकुमार गावित यांचे मंत्रीपद जाईल ,या भितीने विजयकुमार गावित सह अनेक दोषी कंत्राटदार व दलाल घाबरले आहेत. कितीही दबाव आला तरी आम्ही तक्रार मागे घेणार नाहीत, अशी ठाम भुमिका सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स सह बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी घेतली आहे.करोडोंचा भ्रष्टाचार केलेले आदिवासी विकास विभाग हेच खाते विजयकुमार गावित यांना देण्यात आल्यामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे.आता बिरसा फायटर्सच्या आंदोलनाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
            50 खोके एकदम OK या घोषणेला धरून भाजपाचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेल्या 6000/ कोटी भ्रष्टाचार घोटाळ्याचा विरोध आता 6000 खोके विजयकुमार गावित एकदम OK असा नारा देऊन आदिवासी करत आहेत.

Post a Comment

0 Comments