*बिरसा फायटर्सच्या शाखांचा आकडा 250 पार*
*एका वर्षात सर्वात जास्त शाखा असणारी भारतातली व महाराष्ट्रातली पहिली संघटना*
*बिरसा फायटर्स मध्ये तरुणांची संख्या अधिक*
दापोली: बिरसा फायटर्सच्या दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी 10 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या.या शाखांत जिल्हा शाखा हिंगोली,तालुका शाखा सेंधगांव,गोंधनखेडा जिल्हा हिंगोली,महिला शाखा गोंदनखेडा,महिला शाखा तिरोडा जिल्हा गोंदिया,शेलकुवी तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार, सोन तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार ,धनाजे खूर्द तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार ,जामगे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी,अलिबाग जिल्हा रायगड इत्यादी शाखांचा समावेश आहे.राम डाकरे यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.राम डाकरे यांनी बिरसा फायटर्स मध्ये 200 पदाधिका-यांसोबत हिंगोली जिल्ह्यात 3 शाखा तयार करत दमदार प्रवेश केला.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ,अशा शुभेच्छा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिल्या आहेत. राज्यातील सर्व बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी नवीन शाखांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.या नवीन शाखांमुळे बिरसा फायटर्सच्या शाखांचा आकडा 250 च्या पार झाला आहे.त्यामुळे बिरसा फायटर्स ही एका वर्षात सर्वात जास्त शाखा असणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातली पहिली व एकमेव संघटना झाली आहे.या संघटनेत तरुण मंडळी मोठ्या संख्येने येत आहेत.
0 Comments