Advertisement

रत्नागिरी जिल्ह्यात बिरसा फायटर्सचे 10 उमेदवार

*चंद्रभागा पवार हर्णे पंचायत समिती गटाच्या उमेदवार* 

दापोली:जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाची आरक्षण सोडत शुक्रवारी दापोली पंचायत समीतीत जाहीर करण्यात आली.हर्णे पंचायत समिती गट हा अनुसूचित जमाती महिला म्हणजेच आदिवासी महिला उमेदवारासाठी राखीव म्हणून जाहीर झाला आहे .बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे हर्णे गटातून चंद्रभागा पवार ह्या निवडणूक लढणार आहेत.तशी इच्छा त्यांनी हर्णे येथे रविवारी जाहीर केली.चंद्रभागा पवार ह्या विद्यमान कुडावळे ग्रामपंचायत सदस्या आहेत. 
             आदिवासी महिला उमेदवार चंद्रभागा पवार,सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स व काही आदिवासी कार्यकर्त्यांनी हर्णे येथील स्थानिक लोकांची रविवारी भेट घेतली.चंद्रभागा पवार यांचा हर्णे गटातील मतदारांशी दांडगा संपर्क आहे. सामाजिक कार्यात नेहमीच धडपड करताना व अग्रेसर दिसत असल्यामुळे चंद्रभागा पवार ह्या आदिवासी महिला उमेदवाराला हर्णे गटातून स्थानिकांची पसंती आहे.त्यामुळे पवार ह्या गटातून निवडून येतील,अशी खात्री आतापासूनच वर्तवली जात आहे.पवारताई निवडणुकीला उभ्या राहिल्या तर हर्णे गटातून बिनविरोध निवडून येतील,अशाही प्रतिक्रिया हर्णे येथील हितचिंतकांनी व्यक्त केल्या.
                    दापोली तालुक्यातील हर्णे,कुडावळे,केळशी ,पालगड हे 4 पंचायत समिती गट व पालगड,केळशी,हर्णे हे 3 जिल्हा परिषद गट ,असे दापोली तालुक्यातील एकूण 7 उमेदवार व खेड तालुक्यातील सुकिवली जिल्हा परिषद गट हा आदिवासी महिला राखीव जाहीर करण्यात आला आहे,म्हणून सुकिवलीतून आदिवासी महिला बिरसा फायटर्स तर्फे निवडणूक लढणार आहेत.त्याचबरोबर सुकिवली या पंचायत समिती गटात सुद्धा बिरसा फायटर्सचा उमेदवार राहणार आहेत,असे खेडमधून 2 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. मंडणगड तालुक्यातून कुंबळे या पंचायत समितीत गटातून 1 उमेदवार असे जिल्ह्यात एकूण 10 उमेदवार आम्ही उभे करणार आहेत,काही उमेदवार हे सर्वसाधारण गटातून लढणार आहेत, अशी घोषणा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी हर्णे येथे जाहीर केली.रत्नागिरी जिल्ह्यात आदिवासींचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही हे 10 उमेदवार उभे करणार आहोत,कुठल्याही राजकीय पक्षाची मदत न घेता आम्ही ही निवडणूक लढणार आहेत. आमचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, अशी मला खात्री आहे,235 शाखा असणा-या बिरसा फायटर्सचे राज्यभर उमेदवार उभे राहणार आहेत, अशीही माहिती पावरा यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments