Advertisement

कुपोषणाचा आकडा 0 तर 6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात किती 0?

*माता व बालके नाराज,विजयकुमार गावितमुळे संजीवनी योजना बंद होणार?*

*5 वर्षांत कुपोषणाने एकही बालकाचा मृत्यू नाही; मंत्री विजयकुमार गावित यांची सभागृहात खोटी माहिती*

*चुकीची माहिती देऊ नका;विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर* 

*आदिवासींना असा ठग मंत्री नको:सुशिलकुमार पावरा*

 मुंबई:गत 5 वर्षांच्या कालावधीमध्ये 16 आदिवासी जिल्ह्यामध्ये कुपोषणामुळे 8 हजार 842 बालके मरण पावली हे खरे आहे काय? असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा सभागृहात दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी विचारला.त्यावर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी उत्तर दिले की,हे खरे नाही.16 आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणांमुळे एकाही बालकाची मृत्यू झाला नाही.अशी चूकीची, खोटी व दिशाभूल करणारी माहिती विजयकुमार गावित यांनी दिली.नवसंजीवनी योजना राबवताना माता व बालके यांना अडचणी निर्माण होत आहेत, गेल्या 5 वर्षांत कुपोषण मुळे बालकांचा झालेला मृत्यु आकडा सांगा,अशा प्रश्नावर विजयकुमार गावित यांनी सांगितले की आम्हाला जी आकडेवारी प्राप्त आहे ,त्याच्या मध्ये कुपोषण मुळे एकाही बालकाचा मृत्यू झाला नाही.यावर दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की विजयकुमार गावित यांनी 8 हजार 842 बालकांचा कुपोषण मुळे मृत्यू झाला तरी एकाचाही मृत्यू झाला नाही अशी खोटी माहिती सभागृहात देत आहेत, ही एक गंभीर बाब आहे.टिव्हीवर वृत्तपत्रात आपण दररोज वाचतो व बघतो की राज्यात अनेक जिल्ह्यात कुपोषणामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाला.तरी आदिवासी विकास विभाग यावर आपली जबाबदारी का झटकत आहे?या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे.हा प्रश्न उद्या राखून ठेवा.असे चुकीचे उत्तर अपेक्षित नाही.कोर्टात सुद्धा यांनी दिलेल्या माहीतीत तफावत आहे.India today च्या अहवालानुसार गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्रातील 16 आदिवासी जिल्ह्यात 7582 बालकांचा कुपोषण मुळे मृत्यू झाला.ही बाब कोर्टाने सुद्धा सुनावणी दरम्यान निदर्शनास आणून दिली आहे व त्यावर ताशेरे ओढले आहेत. चूकीची माहिती कोर्टात देता, सभागृहात दुसरीच माहीती देता. यावर तूम्ही काय कारवाई करणार? हे सुद्धा उद्याच्या प्रश्नावर उत्तर पाहिजे.
                        कुपोषण मुळे एकाही बालकाचा मृत्यू झाला नसेल तर प्रश्न राखून ठेवण्यात अर्थ नाही,असे उत्तर विजयकुमार गावित यांनी दिले.चौकशी करतो,माहिती घेतो आणि पटलावर ठेवतो,असे बोलले.यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचना केली की ,प्रश्न स्पष्ट विचारला गेला आहे की ,कुपोषणमुळे किती बालकांचा मृत्यू झाला आहे?आपण उत्तर दिले की,एकही मृत्यू झाला नाही.हे शासनाच्या अधिकृत सभागृहात दिलेले अधिकृत उत्तर आहे असे आम्ही ग्राह्य धरतो आणि जर यात तफावत दिसून आली तर ते चुकीचे ठरेल म्हणून चुकीची माहिती देऊ नका,याबद्दलची माहिती घेऊन तुम्ही उद्या परत दिली तर ते संयुक्तिक ठरेल, म्हणून आपण या विषयाची संपूर्ण माहिती घ्यावी आणि उत्तर द्याव.असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयकुमार गावित यांना सुनावले व सूचना केली.
                     15 जुलै ते 15 ऑगस्ट या फक्त एका महिन्यात मेळघाट या आदिवासी भागात 18 बालकांचा कुपोषण मुळे मृत्यू झाला आहे,संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आकडेवारी वाढेल .5 वर्षांचा आकडा तर किती तरी जास्त असेल. असा विरोध विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला.त्यामुळे मंत्री विजयकुमार गावित यांची चांगलीच गोची निर्माण झाली.
                             विजयकुमार गावित यांच्या अशा चुकीच्या उत्तरामुळे कुपोषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या संजीवनी सारख्या योजना बंद होतील, माता व बालकांचा लाभ मिळणार नाही,त्यामुळे माता,पालक व बालक सुद्धा नाराज झाली आहेत .6 हजार कोटी भ्रष्टाचार करून आदिवासींचे पैसे लुटून आदिवासींना लुटणारा असा लुटारू मंत्री,5 वर्षांत कुपोषण मुळे एकही बालकाचा मृत्यू झाला नाही,अशी खोटी व चुकीची माहिती देणारा खोटारडा मंत्री,सुविधा नसल्यामुळे झोलीत जाताना आदिवासी गरोदर महिलेला आपल्या 2 जुळ्या बालकांना गमवावे लागले,असा माता परिवारास भेट नाकारणारा असंवेदनशील मंत्री,ज्याने करोडो रूपयांचा भ्रष्टाचार करून आदिवासींची लुटमार केली आहे असा भ्रष्ट मंत्री ,आदिवासींना,शासनाला,मंत्र्यांना, आमदारांना सभागृहात ठगणा-या ठग मंत्री विजयकुमार गावित आम्हा आदिवासी जनतेला नको आहे,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली आहे.
           कुपोषणाचा आकडा 0 तर 6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात किती 0 ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.जिकडे तिकडे यांना फक्त 0 आकडाच दिसतो,असा टोला सुशिलकुमार पावरा यांनी लगावला आहे.

Post a Comment

0 Comments