Advertisement

संसद भवनातील विवादित अशोक स्तंभ नव्याने बनविण्याची मागणी

एस के जी पंधरे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक राष्ट्रीय  विश्व पञकार संघ 

*अशोक स्तंभाच्या विटंबनेचा बिरसा फायटर्सने केला निषेध*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिरसा फायटर्सचे निवेदन* 

नागपूर (१५जुलै ) देशाच्या शांततेचे प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाचे जाणीवपूर्वक आक्रमक रूप दाखवून विटंबना केली गेली आहे.म्हणून संसद भवनातील विवादित अशोक स्तंभ पुन्हा नव्याने बनविण्याची मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
             या निवेदनात म्हटले आहे की,दिनांक 11 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या छतावरील अशोक स्तंभाचे अनावरण केले.त्यात अशोक स्तंभाची विटंबना करण्यात आली आहे.कारण अशोक स्तंभात सिंहाचे स्वरूप बदलून आक्रमक व अक्राळ विक्राळ सिंह दाखवण्यात आले आहेत.अशोक सम्राट यांनी युद्ध सोडून शांततेचा धर्म स्वीकारला होता.अशोक स्तंभ हे शांततेचे प्रतिक असून आक्रमक रूप दाखवणे चुकीचे आहे,.हे शांततेचा प्रतिकाचा अवमान आहे
मानचिन्ह नव्हेच तो ऐतिहासिक ठेवा आहे..
             अशोक स्तंभावर कोरलेल्या सिंह, घोडा,बैल, हत्ती या प्राण्याचे एक विशिष्ट महत्त्व आहे.या प्राण्या शिवाय स्तंभावर 24 आरे असलेले अशोक चक्र आहे. 24 आरे मनुष्यातील 24 गुणांचे वर्णन करतात. यांना समय चक्र सुद्धा म्हटले जाते.भारतात सारनाथ, फिरोजशहा,अलाहाबाद, रांची,लौरिया नंदनगड ,वैशाली या ठिकाणी प्रसिद्ध अशोक स्तंभ आहेत.यापैकी रुपये ( भारतीय चलणात ) भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेली राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेली आहे.अशा अशोक स्तंभाच्या स्वरूपात बदल केल्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहे.म्हणून सदर अशोक स्तंभ 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाने स्वीकारलेल्या स्वरूपातच असावा,अशोक स्तंभ पुन्हा नव्याने बनविण्यात यावा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments