Advertisement

राज्यसभा खासदारपदी पी. टी. उषा यांच्या नियुक्तीचे ऑरेंज सिटीत हर्षोल्लासात स्वागत


"हा तर संपूर्ण क्रीडा क्षेत्राचा सन्मान" - डॉ. शरद सुर्यवंशी"
 
एस के पंधरे
उपसंपादक
Tribal Tiger 47 News

नागपूर :- अर्जुन पुरस्कार विजेती आणि ऑलिम्पियन पी. टी. उषा यांची नुकतीच राज्यसभा सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. टी. उषा यांना राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती देऊन संपूर्ण क्रीडा क्षेत्राचा मान आणि सन्मान वाढविला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी केले.

राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने एका छोटेखानी आनंद सोहळा कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या मैदानावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. आदित्य सोनी व डॉ. राजेंद्र हाडके उपस्थित होेते.

  याप्रसंगी बोलतांना डॉ. सुर्यवंशी म्हणाले, पी. टी. उषा या नियुक्तीबद्दल संपूर्ण खेळाडूंमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. विशेषता परीक्षा खेळाडूंमध्ये हा आनंद द्विगुणित झालेला आहे. पी. टी. उषा यांनी केवळ देशासाठी सुवर्ण पदकेच प्राप्त केली नाही, तर महिलांसाठी क्रीडा क्षेत्रात वाटा वाढविण्यास, त्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे बघून इतर खेळांच्या महिला खेळाडू मैदानावर येण्यासाठी प्रोत्साहित झाल्या. अनेक पालकांनी तिच्यापासून प्रेरणा घेउन आपल्या मुलींना खेळासाठी प्रेरित केले.

 नागपुरातील ईश्वर देशमुख कॉलेजमध्ये स्कूल नॅशनल स्पर्धा त्यांनी खेळली आहे. अगदी छोट्याशा गावातून सुरुवात करून आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट करणाऱ्या आणि ऑलिम्पिक पदक थोड्याच अंतराने दूर राहिलेल्या पी. टी. उषा या क्रीडा क्षेत्रासह सर्व युवा खेळाडूंसाठी विशेषत महिलांसाठी त्याची कामगिरी खूपच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सहसचिव रामचंद्र रामचंद्र वाणी आणि अर्चना कोट्टेवोर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मिठाई वाटून खेळाडूंनी आपला आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments