आज दिनांक १०जुलै २०२२ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी शिबिर व समुपदेशन शिबिर आयोजित करण्यात आले.
ह्यावेळी शाळेतील मुलामुलींचे आरोग्य तपासणी व कोणताही आजार व विकृती होऊच नये ह्यासाठी कोणकोणती काळजी, कोणकोणत्या उपाययोजना व दैनंदिन जीवनातील कोणते आहारविहार आचरणात आणले पाहिजे ह्यासाठी समुपदेशन करण्यात आले.
शाळेतील जे विद्यार्थी सिकल सेल वाहक व ग्राहक विद्यार्थ्यांची काळजी संदर्भात मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला तसेच जे विद्यार्थी सिकलसेल तपासणी न झालेले आहे त्यांचे सिकलसेल तपासणी साठी लवकर शिबिराचे नियोजन करण्याचे योजिले आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे महत्व सांगण्यात आले व त्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक विकृती टाळता येईल ह्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मुलींच्या अनेक शारीरिक व मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
ह्या पावसाळी वातावरणामुळे काही आजार अथवा लक्षणे आढळल्यास लागलीस आपल्या हॉस्टेलचे अधीक्षक अधिक्षिका ह्यांना वेळेवर कळवून वेळेवरच औषधोपचार अथवा तत्सम काळजी अथवा आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आणून योग्य औषोधपचार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ह्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पावरा, डॉ.संदीप वळवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, श्री.महेश पावरा ह्यांनी वरील सर्व माहिती देऊन विद्यार्थ्यांचे मुला-मुलींचे अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समुदेशन व मार्गदर्शन केले.
ह्यावेळी शाळेचे अधीक्षक श्री.अमित शाह सर, अधीक्षिका श्रीमती कोकिळा पावरा मॅडम, श्री.मावडी सर, श्री.शब्बीर पावरा सर ह्यांनी सर्व आरोग्य टीमचे आभार मानले.
0 Comments