Advertisement

जागतिक आदिवासी दिनी दापोलीत आदिवासींची सांस्कृतिक रॅली

*जागतिक आदिवासी दिनाच्या तयारीसाठी बिरसा फायटर्सची सभा संपन्न*

*पोलीस निरीक्षक दापोली यांना निवेदन* 

दापोली : 9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिन दापोली येथे साजरा करण्यासाठी दिनांक 24/07/2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली कुडावळे आदिवासीवाडी येथे सभा संपन्न झाली.जागतिक आदिवासी दिनानिमित्त पैन्शनर हाॅल दापोली येथे गुणवंत आदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्याचबरोबर या दिवशी दापोली शहरात रॅली काढण्यात येणार आहे,अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी सभेत दिली.सभेला बिरसा फायटर्सचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षा चंद्रभागा पवार,कार्याध्यक्ष संदिप पवार,शिवाजी पवार तसेच आदिवासी वाडीतील महिला पुरूष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                     9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिन आहे.आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी, विविधतेत एकता टिकून राहावी,आदिवासींचे हक्क व अधिकार यांची ओळख होऊन कर्तव्याची जाणीव व्हावी,म्हणून हा दिवस देशभरात आदिवासी बांधव साजरा करतात.दापोलीत सुद्धा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता पेन्शनर हाॅल दापोली पासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बसस्थानक दापोली, पोलीस ठाणे दापोली,पंचायत समिती दापोली,बुरोंडी नाका,तहसिल कार्यालय दापोली,पेन्शनर्स हाॅल दापोली पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.अशा आशयाचे पत्र पोलीस निरीक्षक दापोली यांना सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments