Advertisement

"एस.डी.आर.एफ." च्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करा!

( एसकेजी पंधरे महाराष्ट्र सह- संघटक रा विश्व पञकार संघ )



नागपूर/हिंगणा:- राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर एमआयडीसी हिंगणा येथे नुकतेच असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव व पालक सचिव जिल्हा नागपुर, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर या दलास सकाळी १२.१० वाजता भेट दिली. सदर भेटीदरम्यान राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक तथा नियंत्रक अधिकारी पंकज डहाणे, सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के, पोलीस निरीक्षक प्रदीप भजने, बादल विश्वास, वैद्यकीय अधिकारी आनंद झाडे, पोलीस उपनिरीक्षक आर. के. डवरे, एम. जे. परीहार, एस. डी. कराळे, आर. जी. भारद्वाज, एस. पी. बोंदर, एस. एम. सज्जनवार, डी. पी. कोकाटे तसेच या दलातील रेस्क्युअर पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते.
 राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपुर्ण कार्यालय व परीसर यांना भेट दिली. सदर भेटी दरम्यान राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील उपलब्ध असलेले साहीत्य, साधनसामुग्री व उपकरण यांची प्रदर्शनी लावण्यात आले. सदर प्रदर्शनी दरम्यान साधनसामुग्री व उपकरणाविषयी सविस्तर माहीती देण्यात आली. तसेच आगामी मान्सुन करीता या दलाने केलेल्या तयारी बाबत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर येथिल ०१ टिम जिल्हा गडचिरोली या ठिकाणी मान्सुन करीता तैनात करण्यात आलेली आहे. तसेच सद्यस्थितीत गटमुख्यालय नागपुर येथे ०२ कार्यकारी (ॲक्टीव) टिम व ०१ प्रशासन (ॲडमिट्रेशन) टिम सतर्क ठेवण्यात आलेल्या आहेत. व या दलाकरीता कोणकोणते साहीत्य व साधन सामुग्री तसेच उपकरण आवश्यक आहे याबाबत आढावा घेण्यात आला.
राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर येथे असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव व पालक सचिव जिल्हा नागपुर, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. सर्वात शेवटी प्रधान सचिव यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर या दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे प्रदर्शनी व वृक्षारोपन कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल अभिनंदन करुन आगामी मान्सुनमध्ये उत्तम प्रकारे कार्य करावे याबाबत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments