Advertisement

आदिवासी महिलेला जिवंत पेटविणा-यांना फाशी द्या: बिरसा फायटर्सची मागणी

 दापोली: मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात आदिवासी महिलेवर डिझेल टाकून पेटवणा-या आरोपींना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती,पंतप्रधान,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी गुना,पोलीस अधीक्षक गुना यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन सुरेश पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मनोज पावरा राज्याध्यक्ष,राजेश धुर्वे राज्य उपाध्यक्ष,राजेंद्र पाडवी महासचिव, दादाजी बागूल महानिरीक्षक,विलास पावरा नाशिक विभागीय अध्यक्ष,भरत पावरा जिल्हाध्यक्ष नंदूरबार,गणेश खर्डे कार्याध्यक्ष नंदूरबार, जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख नंदूरबार इत्यादी पदाधिका-यांनी पाठविली आहेत. 

                     निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 3 जुलै 2022 रोजी 38 वर्षीय आदिवासी महिला रामप्यारी सहारिया यांना त्यांच्याच शेतात अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्यात आले. अशी भयानक घटना मध्यप्रदेशात गुना जिल्ह्यात घडली आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.
              महिलेची तब्येत अत्यंत गंभीर आहे.शेताच्या मुद्द्यावरून गुन्हेगारांनी हे कृत्य केले. गुन्हेगार बळजबरीने रामप्यारी यांच्या शेतात मशागत करत होते. त्यांना रोखण्यासाठी गेल्यावर ही घटना घडली. 23 जून रोजी रामप्यारी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. पण पोलिसांनी काहीच उपाययोजना केली नाही.विशेष म्हणजे सहारिया ही मध्य प्रदेशातील vulnerable आदिवासी जमात आहे.मध्य प्रदेशात आदिवासींची लोकसंख्या एकूण 22 टक्के आहे.सदर महिलेने पोलिसांकडे तक्रार करूनही पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला असल्याचे कळते.
 आदिवासी महिलेवर डिझेल टाकून पेटवून दिले गेले.ह्या घटनेमुळे आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.तरी आदिवासी महिलेवर डिझेल टाकून पेटवून देणा-या आरोपींना फौजदारी गुन्हे दाखल करुन जलद खटल्याद्वारे फाशीची शिक्षा देण्यात यावी.ही विनंती .अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशाराही बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments