Advertisement

बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याला यश


तळोदा: आदिवासी वसतिगृह प्रवेश वेबसाईट त्वरित सुरू करून जुने व नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया राबवून पूर्ण क्षमतेने वसतिगृहे त्वरित सुरू करा,अशी मागणी भरत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प अधिकारी तळोदा यांना करण्यात आली होती.त्याचबरोबर राजेंद्र पाडवी महासचिव महाराष्ट्र,गणेश खर्डे कार्याध्यक्ष नंदूरबार, जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख नंदूरबार ,राजेश धुर्वे उपाध्यक्ष महाराष्ट्र, सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स इत्यादी पदाधिकारी यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक, प्रकल्प अधिकारी तळोदा यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवली होती. अखेर त्याची दखल घेऊन प्रशासनाने आदिवासी वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे.विद्यार्थ्यांनी बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले आहेत. 
                    शैक्षणिक वर्ष २०२२-२३ हे १५ जूनपासून सुरू होऊन, शाळा,महाविद्यालये हे नियमितपणे सुरू आहे.परंतु,जुने व नवीन विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया वेबसाईट बंदचे कारण सांगून,तालुका बाहेरील व तालुक्यातील लांबचे जुने वसतिगृह विद्यार्थी इयत्ता ९,१०,१२ वी व इतर वर्गातील विद्यार्थी संबंधित विभागाचा चुकीचा,भोंगळ कारभारामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.१५ जूनपासून शाळा सुरू होणार हे माहिती असतांना,वसतिगृह प्रवेश वेबसाईट आतापर्यंत बंदच का??यावर्षीचे इयत्ता ९,१०,१२वीचे जुने वसतिगृह विद्यार्थी.मग,गुणपत्रक,इतर कागदपत्रे घेऊन प्रवेश देण्यास अडचण काय??आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खेळखंडोबा का???वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऐवळी संथ गतीने का??
                तसेच,आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या प्रवेश निवड प्रक्रियांची यादी अद्यापही लावलेली नाही. संबंधित विभाग विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी,त्वरित वसतिगृह प्रवेश प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे हि विनंती.अन्यथा,लवकरच विद्यार्थ्यांसह बिरसा फायटर्स आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.असा इशारा सुद्धा बिरसा फायटर्स संघटनेने दिला होता.

Post a Comment

0 Comments