Advertisement

कोपरगाव:सुरेगाव येथे कर्जाला वैतागून गरीब शेतकऱ्याची आत्महत्या

कोपरगाव:तालुक्यातील सुरेगाव या गावांमध्ये नामे दिलीप दिनकर निकम वय वर्ष (५०) या शेतकऱ्याला ४ मुली ,१ मुलगा व पत्नी असा मोठा परिवार होता मुलांच्या शिक्षणासाठी या शेतकऱ्याने अनेक बँक,सोसायटी,पतसंस्था तसेच खाजगी कर्ज देखील उचलल्या कारणाने हा शेतकरी कर्ज बाजारी झालां होता,शेतातील उत्पन्न समाधानकारक न मिळाल्याने कर्जाच्या व्यापाला कंटाळून,मुलींचे लग्न,शिक्षणासाठी कोणताही मार्ग न उरल्याने उदरनिर्वासाठी हाल अपेष्टा सहन न झाल्याने, नैराशयातून दिनांक १८-७-२०२२ रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील करता पुरुष गेल्याने त्यांच्या शिक्षण घेत असलेल्या ५ मुले व पत्नी हे निराधार झाले आहेत व प्रपंच उघडा पडल्याने सुरे गाव व कोपरगाव तालुक्यात दुःखद तसेच शोकाकुल वातावरण पसरले आहे

Post a Comment

0 Comments