Advertisement

सातपुड्यातील आदिवासी क्षेत्रातील कोडीद गावात आज रोजी नेवपी (दितवाऱ्या) पूजन


    सातपुड्यातील शिरपूर तालुक्यातील कोडीद गावात आज आदिवासी सण उत्सवातील पहिला सन नेवपी(दितवाऱ्या) सणाचे पूजन केले गेले सर्व प्रथम प्रत्येकाच्या घरी तरुण बनवण्यात येते त्यात मिर्ची, कांदा, आंब्याचे पान लिंबाचे असे मिळून एक तरुण आबाळ्याच्या दोरी बनवुन तरुण बनवले जाते हे पूजन प्रमुखता पूर्ण पेरणी झाल्या नंतर पूजन केली जाते यावेळेस गावातील प्रमुख देवी देवता, वाघ देव, बाप देव, निवसा कुवर, कावाराणा, गाजण गुटा, विजवा माळी, नागदेव आदी देवी देवतांचे पूजा करून मक्की चे गाठा चुलीवर बनवून विशेष मानता केली जाते, यावेळी पूजा विधी अंडा, नागदेव, हिरवा चारा निवसा कुवर, नारळ सेंदूर, आदी सर्व पूजा सामुग्रीने पूजा केली जाते विशेष म्हणजे या दिवशी वरहात देवाला(पावसाला) विनंती
 करून येण्याची विनंती करीत असतात या दिवशी घरात न जेवण न बनवता बाहेर चुला बनवून मक्कीचा गाठा बनवून स्वयंपाक करीत असतात व देवस्थानी ही स्वयंपाक केला जातो तेथे छोटे-छोटे लाडु बनवून खाऊन उरलेल्या कच्ची घाटाचे सागाच्या पानात छोट्या छोट्या पुड्या बनवून प्रत्येक घराला देत असतात ही पुडी घरात दरवाज्यावर खोपचतात यादिवसापासून छपरावर सागाच्या पान ठेवणे, हिरवा चारा गुरांना चारणे, शेणाने घर सारवणे आदीला सुरवात केली जाते 
    या पूजे(सणा) नंतर आदिवासी संस्कृतीतील सण उत्सवाला सुरवात होते हे पूजन(सण) हा वर्षातील पहिला पूजा(सण) मानला जातो
या दिवशी गावचे प्रमुख पुजारा, गाव पाटील, गाव प्रमुख(डायला), गाव नागरिक आदींच्या उपस्थितीत ही पूजा विधीवत केली जाते.

(वरील संकलित माहिती श्री.दशरथ पावरा सर यांनी प्रमुख व्यक्तीशी संवाद साधून माहिती मिळवली)


 *संकलन*
 
 *दशरथ पावरा(बोरपाणी)*

Post a Comment

0 Comments