आज कोपरगाव तालुक्यात आदिवासी भिल्ल समाज हा ५० हजाराहून जास्त लोक संख्येच्या प्रमाणात आहेत परंतु आदिवासी समाज बांधवांना अद्याप कोणत्याही मोठ्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही,तसेच राजकीय क्षेत्रात देखील डावलले जाते,त्यांची वरचा वर बोळवण केली जाते त्याच प्रमाणे एवढा मोठा भिल्ल समाज तालुक्यात असताना देखील भिल्ल समाजाचा महापुरुषांचा एकही पुतळा कोपरगाव तालुक्यात नाही याची शोकांतिका वाटते, द्रौपदी मूर्मु या या बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे राष्ट्रपती झालेल्या असून त्यांना वयक्तिक कोणीही राष्ट्रपती बनवले नाहीत परंतु काही राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाची दिशाभूल करून देखावे करत आहेत तर आज कोपरगाव तालुक्यामध्ये हजारो आदिवासीं यांना वनपट्टे अद्याप मिळाले नाही ते खूप मोठा संघर्ष करत आहेत कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील बहुसंख्य आदिवासींनी वनपट्टे काढले होते ते कसतही होते, परंतु गावात राजकारण करून शासकीय यंत्रणा हाताशी धरून करंजी येथील आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये देखील दाबले होते हा प्रसंग कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाज कसा विसरेल अशी खोचक टीका एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली!याउलट आदिवासी समाज बांधवांना खरा न्याय तेव्हा भेटेल जेव्हा तालुक्यात एकलव्य यांचे स्मारक उभे राहील असे देखील मंगेश औताडे म्हणाले! तसेच यावेळी ते म्हणाले की एकलव्य आदिवासी परिषद या संघटनेचे जाळे अवघ्या महाराष्ट्रात २६ तालुक्यात पसरले आहे यात कोपरगाव तालुक्यात ४२ गावात एकलव्य आदिवासी परिषद ही संघटना मजबूत असून येत्या काळात राजकीय क्षेत्रात देखील अमुलाग्र बदल करून एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची लवकरच तालुका बैठक घेऊन राजकीय हालचालींना वेग येणार आहे अशी प्रतिक्रिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी दिली आहे
0 Comments