Advertisement

बिरसा फायटर्सच्या मागणीला यश

*जाचक अटी रद्द, शेतक-यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान* 

*बिरसा फायटर्सने मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदन* 

दापोली: राज्य सरकारने 15 जुलै रोजी मोठे निर्णय घेत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे ,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोहच सुद्धा प्राप्त झाली होती.बिरसा फायटर्स संघटनेने राज्यभर या मागणीची निवेदन दिली होती. अखेर आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 
                   महात्मा फुले कर्ज माफी योजनेत शेतक-यांना अनुदान देताना काही जाचक अटी शासनाकडून ठेवण्यात आल्या आहेत.सन 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली आहे,त्यांना या योजनेत वगळण्यात आले होते. या जाचक अटींमुळे लाखो शेतकरी या कर्ज माफी योजनेपासून वंचित राहतील,अशी खंत व्यक्त करत ह्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी सुशिलकुमार पावरा यांनी केली होती. 
                  जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांच शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. तर 50 हजार रुपयांचं हे अनुदान शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. जे शेतकरी नियमित पीक कर्ज परतफेड करत होते. मात्र त्यांना काही जाचक अटींमुळे हे अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच प्रशासनाला निर्देश दिले आहेत. तसेच कोल्हापूर, सांगलीतील पूर आलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments