Advertisement

गिम्हवणे मराठी शाळेत विठ्ठल रुखमाई आषाढी एकादशी अवतरले

 दापोली:दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद केन्द्र शाळा गिम्हवणे शाळेमध्ये आषाढी एकादशी निमीत्त संत सेवेचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वारीत विद्यार्थ्यांनी अनेक संतांची वेशभूषा केली होती. सर्व पालकांनी अतिशय उत्साहात आपल्या मुलांना वारकरी वेशात तयार करून शाळेत पाठवले होते.
                विठ्ठलाची वेशभुषा हर्ष दिपक दुबळे तर रुक्मीणीच्या वेशभुषा पूर्विता मासेकर धारण केली होती. विठ्ठल रुखमाईच्या नामगजरात प्रत्यक्षात पंढरपूरच शाळेत अवतरले होते. संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.शाळेतील लहान मुले पारंपरिक वेशभुषेत सुंदर दिसत होती.
              या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, सदस्य , पालक यांनीही सहभाग घेतला.शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिका प्रिया पवार, मुग्धा सरदेसाई,सुखदा गोरड,रश्मी शिगवण, निर्मला पारदुले, आलिशान अहिरे इत्यादी शिक्षकांनी मेहनत घेतली होती. गिम्हवणे शाळेतील या आषाढी एकादशी कार्यक्रमाचे केन्द्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments