*पित होते नाल्याचे व पावसाचे पाणी*
*गटविकास अधिकारी दापोली यांनी घेतली निवेदनाची दखल*
दापोली:स्मशानभूमीसाठी संघर्ष करत असलेल्या जामगे ग्रामपंचायतमधील नवानगर कातकरवाडी व कातकरवाडी या दोन वाडीसाठी आदिवासी बांधवांना पाण्याचीही सोय नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. जामगे गावातील आदिवासी बांधवांचा स्मशानभूमीचा विषय ताजा असतानाच पाण्याचाही गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना सांगून दाखवला.त्यानंतर लगेच निवेदन तयार करून जामगे येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालय दापोली येथून आपला मोर्चा गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोलीकडे वळवला. जामगे येथील आदिवासी बांधवांना पाण्याची व्यवस्था करा,अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी दापोली यांना बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक 29 जूून रोजी देण्यात आले होते.कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय अशा घोषणा पंचायत समिती दापोली आवारात देण्यात आल्या होत्या.यावेळी जामगे गावातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावर गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत जामगे यांना दिनांक 18/07/2022 रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे की, जामगे ग्रामपंचायत हद्दीतील नवानगर कातकरवाडी -आदिवासीवाडी व कातकरवाडी या दोन वाड्यांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे.15 व्या वित्त योजना 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बोअरवेल खणून पाणीपुरवठा केला जात होता.परंतु बोअरवेल बंद असल्यामुळे लोक पावसाचे पाणी व नदी नाल्यातील दूषित पाणी पित आहेत, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणून या दोन आदिवासी वाडीसाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करावी,अशा आशयाचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे.त्या अनुषंगाने ग्रामपंचायत ते आपल्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.तसे अर्जदार यांस आपले कडून परस्पर कळविण्यात यावे.केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.असे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली आर.एम.दिघे यांचे पत्र अर्जदार सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना प्राप्त झाले आहे.
बंद पडलेले बोअरवेल तात्काळ चालू करून जामगे येथील नवानगर कातकरवाडी व कातकरवाडी या दोन आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती जामगे येथील आदिवासी बांधवांनी फोनवर सुशिलकुमार पावरा यांना दिली.पाण्याची सोय झाल्याबद्दल जामगे येथील आदिवासी बांधवांनी बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले आहेत.
0 Comments