Advertisement

आज शिरपूर तालुका स्तरीय जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने बैठक करण्यात आली तरी शिरपूर तालुक्यातील सर्व पारधी समाज बांधव एकत्र उपस्थित होते


शिरपूर शहर व तालुक्यातील ९ अॉगस्ट जागतिक आदिवासी दिवस बैठक संपन्न - बैठकीचे आयोजक : *आकाश हिम्मत पारधी* यांनी सांगितले की सद्या 9 ऑगस्ट म्हणजे एखाद्या सण उत्सवासारखी परंपरा सुरू झाली आहे. पण यातून जागतिक आदिवासी दिन का आणि कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झाला? जागतिक आदिवासी दिनाचा मूळ उद्देश काय? हे लोकांना समजावून सांगण्याची भूमिका मागे पडून नुसतीच नाचगाणी, मनोरंजन कार्यक्रमाचे प्रदर्शन यांनाच महत्व प्राप्त होत आहे. हे आदिवासी समाजाला वेगळ्या मार्गाने नेण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. हरकत नाही, अलीकडच्या काळामध्ये नुसतेच बौद्धिक प्रबोधनसाठी लोकं जमत नाही. कला, उत्सव, मनोरंजक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांची गर्दी जमवणं सोपं आहे. म्हणून आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी संस्कृती दर्शक कार्यक्रम, कला मनोरंजन यांचा आधार जरूर घ्यावा पण, आदिवासी दिन म्हणजे नुसतीच अशी मनोरंजक कार्यक्रमाची रेलचेल होऊ नये. तर त्याबरोबर लोकांचे प्रसंबोधनही झाले पाहिजे. तर त्या आदिवासी दिनाला अर्थ राहील अन्यथा असे कित्येक आदिवासी दिन येत जात राहतील. लोक उत्सव म्हणून साजरे करत राहतील. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठीचा मुख्य उद्देश बाजूला पडलेला असेल आणि अज्ञान, गरीबी, शिक्षण, आरोग्य या समस्यांचा विळख्यात सापडलेला बहुसंख्य आदिवासी समुदाय युगानुयुगे तसाच खितपत पडलेला राहील. याला कारण आदिवासी समाजातील सुशिक्षित, नोकरदार आणि राजकारणी लोकं राहतील. 
आदिवासी दिन उत्साहानं, आनंदानं साजरा करा.त्यात समाजातल्या सगळ्या लोकांना तसेच सगळ्या क्षेत्रातील लोकांना सामील करा. काही ठिकाणी राजकारणी लोकं पैसा पुरवून कार्यक्रम घडवून आणतात. पुरवू द्या पैसा. ते त्यांचे कामच आहे. फक्त मंचावरून राजकीय लोकांना राजकीय भाषण करून देऊ नका. आयोजन समितीने ही अट ठेवायला हवी. आदिवासी समाजाचा, इतिहास, आदिवासीं संदर्भातील कायदे , हक्क, संयुक्त राष्ट्र संघाद्वारे जागतिक आदिवासी दिन का सुरू करण्यात आला? आदिवासी समाजाच्या अडचणी, समस्या, आदिवासींच्या विकासासाठी शासन स्तरावरून काय प्रयत्न केले जातात? कोणत्या योजना राबविल्या जातात?या योजनांचे यशापयश काय? आदी अनुषंगाने लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे.
या वेळेस सर्व पारधी समाज बांधव एकत्र यावे अशी घोषणा करण्यात आली 

उपस्थित : आकाश पारधी, दत्तू पारधी, अमोल पवार, निलेश पारधी, हिंमत दाभाडे, विनोद पारधी, भिकन पारधी, हिंमत पारधी राकेश पारधी, नागेश पारधी, बाळु पारधी, रतिलाल पारधी, किरण पारधी, हिरालाल पारधी, अमोल पारधी, भुषण पारधी, प्रकाश पवार, दिलभर पारधी, विशाल पारधी, निलेश पारधी, राजु पारधी,विनोद पवार, विजय पारधी, राहुल पारधी, व शिरपूर तालुक्यातील पारधी समाज बांधव उपस्थित होते 
:- बैठकीचे ठीकाण : पारधी समाज सभागृह शिरपूर येथे होते

Post a Comment

0 Comments