Advertisement

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया धुळे तर्फे आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा बोरपाणी गावाचे दुसरा नंबर ✌🏻✌🏻

दि 12/07/2022 रोजी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया धुळे तर्फे आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना.डॉ तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या वेळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा,नंदुरबार लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. हिनाताई गावीत, मा.मंत्री खासदार डॉ. सुभास भामरे, आमदार काशीराम पावरा, आमदार कुणाल पाटील,आमदार मंजुळा गावित,आमदार जयकुमार रावल, अनेक व प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमिसे व सर्व प्रकल्प स्तरीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पार पडला या प्रकल्प स्तरीय पारंपरिक नृत्य स्पर्धेत धुळे,साक्री,शिंदखेडा व शिरपूर मधून एकूण आठ संघ सहभाग झाले असून शिरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आदिवासी होळी गेर नृत्य घेऊन बोरपाणी ता.शिरपूर येथील संघ *द्वितीय पारितोषिक पटकवले* या साठी पथक प्रमूख दशरथ पावरा, जाणकार भावसिंग पावरा, वाद्य प्रमुख लालसिंग भिल, ढोल प्रमुख तिवाऱ्या पावरा व एकूण 32 लोकांच्या अतूट परिश्रम ने पार पडला व पारितोषिक मिळवले



प्रथम डोंगऱ्या देव नृत्य मोहगाव ता साक्री
द्वितीय वीर बिरसा मुंडा गेरनृत्य पथक बोरपाणी ता.शिरपूर
तृतीय पावरी नृत्य मोहंगाव ता साक्री

पारितोषिक प्रकल्प अधिकार तृप्ती घोडमिसे मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले

Post a Comment

0 Comments