Advertisement

राजकीय पुढा-यांनी आदिवासी समाजाचा वापर फक्त मतांसाठी केला: सुशिलकुमार पावरा

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाची जागा नाही,पाण्याची सोय नाही,अजूनही येथील आदिवासी नदी -नाल्याचे पाणी पित आहेत,ही एक फार मोठी शोकांतिकाच आहे. आरोग्य ,पाणी ,शिक्षण ,मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यासाठी अजूनही येथील आदिवासी बांधव झुंजत आहे.निवडणूूक आली की, आम्ही आदिवासींसाठी हे करु! ते करू ! म्हणणणारे येथील राजकीय पुढारी आदिवासींच्या समस्यांवर गप्प आहेत.आदिवासी बांधवांना आपला मृतदेह जाळण्यासाठी जागाही मिळत नाहीत,अक्षरश येथील आदिवासी बांधवांना पाण्याची सोय नसल्यामुळे नदी नाल्यातील व पावसाचे पडणारे पाणी झेलून पित आहेत,हे येथील राजकीय पुढारी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.आपआपल्या पक्षाचा झेंडा मिरवण्यात मग्न आहेत, गटातटाच्या लढाईत एकमेकांच्या तंगड्या तोडायला तयार आहेत.पण, आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी कुणालाच रस नाही. आदिवासी सुद्धा माणूसच आहे हे आदिवासींनी निवडणूकीत मते देतांना या पुढा-यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे.
        खरं पाहिलं तर या आदिवासी लोकांचा कुणी वालीच नाही.कुणी वाली असता तर या लोकांना स्मशानभूमीसाठी तहसिलदारांचा दरवाजा खटखटावा लागला नसता. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते.येथील आदिवासी अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचितच आहे.अजूनही स्वतःच्या हक्काची जागा नाही,जमीन नाही,राहायला घर नाही,पिण्यासाठी पाणी नाही,मरणासाठी स्मशान भूमी नाही.येथील राजकीय पुढा-यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत फक्त मतांसाठी वापर करून घेतला.शिक्षणाच्या प्रवाहापासूनही दूर ठेवले,मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले,एकंदरीत विकासापासून कोसो दूर ठेवले.आमच्या आदिवासी लोकांची प्रगती होऊ दिली नाही ,तेव्हा आपला वापर फक्त मतांसाठी केलेल्या राजकीय पुढा-यांना आदिवासी जनतेने वेळीच ओळखले पाहिजे व निवडणूकीत राजकीय पुढा-यांना धडा शिकवला पाहिजे.आपल्या समाजाचा विकास साधून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments