*इतर दिवशी आदिवासी दिन साजरा करणा-यांचा विरोध*
नंदूरबार:मागच्या वर्षी बरेच ठिकाणी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.आता तर 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचे सोडून कोण 7 ऑगस्ट ला तर कोणी 12 ऑगस्ट ला ठरवत आहेत,असे अत्यंत चुकीचे असून आदिवासी समाजाच्या एकतेला धोकादायक आहे,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे नंदूरबार कार्याध्यक्ष गणेश खर्डे यांनी दिली आहे.१५ नोव्हेंबर ला जर गौरव दिवस साजरा केला मग ९ ऑगष्ट ला काय करायचं ? 9 ऑगष्ट विश्व आदिवासी दिवस म्हणून UNO ने घोषित केले आहे.मग UNO च्या विरोधात आपण कस काय जाऊ शकतो? आपण UNO पेक्षा श्रेष्ठ झालो का?
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी जीवन, त्याचे हक्क अधिकार, पर्यावरण, कानून व्यवस्था, आर्थिक विकास, विश्व शांती, सामजिक प्रगती असे अनेक बिंदू लक्षात घेवून 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ने आदिवासींचे मानवी हक्क, संरक्षण आणि प्रगतीसाठी विश्व स्तरावर यूएनडब्ल्यूजीएपी नावाची एक कमिटी 1982 साली एक स्थापन केली होती. या कमिटीने जगभरातील आदिवासींचा बारकाईने अभ्यास करून आपला अहवाल युनोला सादर केला. त्यामूळे 1990 मध्ये युनोच्या आम सभेत आदिवासींच्या विषयावर चर्चा झाली व आदिवासींच्या सन्मानार्थ 1993 हे वर्ष "जागतिक आदिवासी वर्ष " म्हणून घोषित करण्यात आले. आदिवासींचे अनेक प्रश्न जगासमोर यावे म्हणून मानवाधिकार दिवसापासून जिनेव्हा येथे 9 डिसेंबर 1993 ला मोठे संमेलन झाले. या संमेलनात अनेक देशाने निवेदन सादर करुन विविध समस्या सादर केले. भारत सरकार ने भारतात आदिवासी नाहीत असा प्रस्ताव सादर केला होता. भारताचे म्हणने असे की, 'भारतात सर्व लोक देशज आहे' त्यानंतर भारतातील अनेक आदिवासींनी एकत्र येवून चर्चा केली आणि जुलै 1994 मध्ये जिनिव्हा येथे आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते गजानंद ब्राम्हणे, त्रिपुराचे पी. के. देब्बारमा , देवेंद्रनाथ हासंदा, महाराष्ट्रचे प्रदिप प्रभू या शिष्टमंडळाने युनोला 'देशज' शब्दाविषयीच्या परिभाषेवर शिपारस केली आणि भारतील 461 आदिवासी समाज (जमाती) हे देशज असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीचे अंतिम निर्णय महत्वपूर्ण ठरला. त्यामूळे 1994 पासून 9 ऑगष्ट हा दिवस UNO ने 'इंटरनॅशनल डे ऑफ द वर्ड इंडिजिनस पीपल डे ( जागतिक आदिवासी दिवस) म्हणून घोषित केले.
आपण बिरसा मुंडा जयंती वर गौरव दिवस साजरा केला तर मग बिरसा मुंडा जयंती केव्हा साजरा करायची ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आशा प्रकारे राजकारण केल गेल आहे आदिवासी समाजासाठी आणि आता वेगळी प्रथा सुरू करण्याची काहींची तयारी चालली आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करायचे सोडून काही ठिकाणी 7 ऑगस्ट व 12 ऑगस्ट ला विश्व आदिवासी दिवस करणार आहेत,असे समजते. म्हणजे यातून आपल्याच लोकांकडून व संघटनांकडून आदिवासींचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार ला आपण वारंवार विनंती करतोय की, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे आम्हाला सुट्टी मिळावी, याचे कारण आदिवासी समाजाचा हा मोल्यवान दिवस आहे. आम्हाला या दिवशी विश्व आदिवासी दिवस UNO ने घोषित केला आहे ,तर आम्हाला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी शासकीय सुट्टी द्यावी अशी मागणी केली आहे. असे असताना सरकार फक्त एक दिवशी ही सुट्टी देणार ,7 ऑगस्ट व 12 ऑगस्ट ला नाही .जर आपण ही 9 ऑगस्ट निमित्ताने साजरा न करता इतर दिवशी करणारं तर सरकार मग आपल्या विश्व आदिवासी दिवस ला नष्ट करुन देतील. यास जबाबदार सरकार नाही तर खुद्द आदिवासी समाज असणार आहे. कारणं की, प्रशासनाने एक दिवसासाठी 9 ऑगस्ट ला आदिवासी दिवस म्हणून नंदूरबार जिल्ह्यात सुट्टी दिली आहे. इतर दिवशी आदिवासी दिवस नाही.
काही संघटना लोकांना जास्त लोकसंख्या दाखवणेसाठी इतर दिवशी आदिवासी दिवस साजरा करत आहे ,जर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा केला तर किती लोक येणार सभेला? तेव्हा सुद्धा जास्त लोक येतील. सरकार ला ही कळेेल की आदिवासींच्या लोकसंख्या भरपूर आहे.जी आपण मागणी करणार त्यांना मागणी द्यावीच लागेल. पण 9 ऑगस्ट सोडून इतर दिवशी आदिवासी दिवस साजरा करून लोकांत काय संदेश देणार? अजूनही वेळ गेली नाही. योग्य मार्गावर येऊन विश्व आदिवासी दिवस साजरा करा. नाही तर आपल्या संघटनांकडून आपल्या आदिवासी समाजाचे अस्तित्व नष्ट करण्याचे काम आपल्याच हातून होईल. आपल्याच पायावर आपण कुऱ्हाडीने घाव घालण्यासारखे होईल.असे मत गणेश खर्डे कार्याध्यक्ष नंदूरबार यांनी व्यक्त केले आहे. 9 ऑगस्टलाच जागतिक आदिवासी दिन साजरा करा व इतर दिवशी साजरा करणा-या संघटनांच्या रॅलीत किंवा सभेत शामिल होवु नका,अशा सूचना सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी राज्यातील बिरसा फायटर्स पदाधिका-यांना दिल्या आहेत.
0 Comments