Advertisement

9 ऑगस्टला बिरसा फायटर्स तर्फे आदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

*जागतिक आदिवासी दिनी आदिवासी कर्मचाऱ्यांचाही सत्कार* 


दापोली: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे निमित्ताने बिरसा फायटर्स तालुका शाखा दापोलीच्या वतीने गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.पेन्शनर हाॅल दापोली येथे सकाळी 11 वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे.दरवर्षी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स हे आपल्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थांकरिता असा गुणगौरव सोहळा आयोजित करत असतात. यासाठी सन 2020-21 या गेल्या वर्षी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीत 60 टक्के पेक्षा अधिक गुण, इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पास झालेले विद्यार्थी ,नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थी,इयत्ता 1 ली ते उच्च पदवीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पदवी व उच्च पदवी मिळवणारे विद्यार्थी,विविध क्षेत्रात विशेष पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी यांनी आपली माहिती नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.या माहितीत विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळेचे किंवा काॅलेजचे नाव,इयत्ता,प्राप्त गुण व टक्केवारी इत्यादी आदिवासी समाजांच्या वाॅटसप ग्रुप माहिती पाठविण्यासाठी सुशिलकुमार पावरा यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
                
  गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून डिजीटल प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, पुष्प देऊन गौरव करण्यात येणार आहे. यादिवशी विविध विभागातील आदिवासी कर्मचारी व अधिकारी यांना तालुका,जिल्हा,विभाग,राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचासुद्धा प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.हा सत्कार नामवंत व प्रसिद्ध व्यक्तींकडून होणार आहे.कार्यक्रमाला दापोलीतील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे,म्हणून आवाहन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे,गरजू व गरीब लोकांना कपडे वाटप करणे ,कोरोना काळात धान्य वाटप करणे,विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे इत्यादी विविध उपक्रम बिरसा फायटर्स संघटनेने राबविले आहेत.

Post a Comment

0 Comments