Advertisement

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे: बिरसा फायटर्सची मागणी


दापोली:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                 निवेदनात म्हटले आहे  की,महाराष्ट्रातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड,धुळे,नाशिक, गडचिरोली,नंदूरबार इत्यादी जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करू नये,म्हणून शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्जमाफ करण्याचा घोषणा आपल्या सरकारने  केली आहे.कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा असून यामुळे नक्कीच शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होईल.शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा फुले कर्ज माफी योजना सुरू केली आहे.महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. सन 2028-19 मध्ये अतिवृष्टी ग्रस्त ज्या शेतक-यांना शासनाने नुकसान भरपाई दिली आहे,त्यांना या योजनेत वगळण्यात आले आहे.
               त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. याशिवाय या योजनेत सन 2017-17,2018-19,2019-20 या कालावधीत बॅंका किंवा संस्थेकडून घेतलेले कर्ज पात्र आहे.या निकषात राष्ट्रीयकृत बॅंका आणि जिल्हा बॅंका यांचे आर्थिक वर्ष वेेगवेगळे असल्याने  शेतक-यांना त्याचा लाभ होणार नाही.म्हणून कोणतीही जाचक अटी न ठेवता  राज्यातील अतिवृष्टीग्रस्त  सर्वच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments