Advertisement

300 वेळा उपोषण करणारा भारतातला एकमेव व्यक्ती


*300 उपोषणांची सरकारी कार्यालयात नोंद*

*300 उपोषणांचा असाही संघर्ष* 

*शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 300 वे उपोषण* 

*रडायचे नाही,लढायचे हा लढण्याचा आदर्श नवीन पिढीला द्यायला आहे: सुशिलकुमार पावरा*

रत्नागिरी: 300 वेळा उपोषण करणारे शिक्षक सुशिलकुमार पावरा हे भारतातील एकमेव व्यक्ती ठरले आहेत.विशेष म्हणजे या 300 उपोषणांची नोंद सरकारी कार्यालयात झाली आहेत.ही उपोषण करतांना सहनशीलता ठेवून पावरा यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.दोषी व बोगस अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा ,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे  शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 300 वे उपोषण दापोलीत सुरू ठेवले आहे. उपोषणाचे निवेदन दापोलीचे तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे.जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नसले तरी शिक्षक पावरा यांनी आपला हा लढा एकाकी सुरूच ठेवला आहे.
                 निवेदनात म्हटले आहे की,  विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने राजकीय पदाधिकारी, समाजकंटक,पालकामार्फत विजय दाजी बाईत यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवले.बनावट प्रकरण पोलिस चौकशीत व बातम्यांद्वारे उघडकीस आले आहे.असे पावरा यांनी म्हटले आहे.
               एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर सुद्धा 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहे.तसेच नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अशा बोगस व वादग्रस्त दोन्ही शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा, माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करावे,अशा एकूण 28 मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी पांगारवाडी दापोली येथे उपोषण सुरूच ठेवले आहे.रडायचे नाही,लढायचे हा आदर्श मला नवीन पिढीसमोर ठेवायचा आहे,असे उपोषण कर्ते पावरा यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments