Advertisement

बिरसा फायटर्सच्या एका दिवसात होणार 300 शाखा


दापोली: सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी बिरसा फायटर्स संघटना सध्या जोरात वाढत आहे.एका वर्षात बिरसा फायटर्सच्या 225 पेक्षा अधिक शाखा पूर्ण झाल्या आहेत. रोज नवीन विषय, रोज नवीन बातम्या,कार्यकर्त्यांचा कामातील उत्साह बघून बाकीच्या संघटनेतील तरुण बिरसा फायटर्स संघटनेकडे आकर्षीत होत आहेत. बिरसा फायटर्सच्या निवेदनांची दखल प्रशासन सुद्धा घेऊ लागल्यामुळे लोकांची कामे झटापट होऊ लागली आहेत. असंख्य आदिवासी तरुणांनी बिरसा फायटर्स मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
         एका नावाजलेल्या राष्ट्रीय संघटनेच्या मुख्य पदाधिका-यांनी बिरसा फायटर्स मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे हे कार्यकर्ते स्वइच्छेने बिरसा फायटर्समध्ये येत आहेत. या संघटनेतील लोकांना आपल्या संघटनेत घ्यायचे किंवा नाही? यावर सुशिलकुमार पावरा यांनी राज्य,विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे म्हणणे मागवले आहे.काही पदाधिकारी यांनी संघटनेत घेण्यास होकार दर्शवला आहे तर काहींनी नकार दिला आहे.यावर एका झूम मिटींग मध्ये चर्चा करून कळवू,असे सुशिलकुमार पावरा यांनी संबंधितांना सांगितले आहे.
        या राष्ट्रीय संघटनेचे जवळ जवळ आर्धे कार्यकर्ते 80 पेक्षा अधिक शाखेसह बिरसा फायटर्स मध्ये येणार असल्यामुळे त्यांचे स्वागतच आहे,अशी प्रतिक्रिया काही बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी दिली आहे.असे झाले तर बिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 300 पेक्षा अधिक शाखा होऊन आणखीन संघटन शक्ती वाढणार आहे.काहीही झाले तरी आम्ही फक्त आपल्या बिरसा फायटर्सच्या बॅनरखालीच काम करणार,अशी प्रतिक्रिया  पदाधिकारी व सदस्यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments