नंदुरबार: नुकतेच निवड केलेले बिरसा फायटर्स धडगांव तालुक्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावरा यांनी 3 महत्त्वाची कामे जिल्हा स्तरावर नंदुरबार येथे प्रत्यक्षात जाऊन यशस्वीरित्या केली आहेत. या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी त्यांनी एक दिवस घालवला.त्यांनी रोजगार हमी योजना,घरकुल योजना व डिबीटी योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर निवेदन दिली व पाठपुरावा केला.
धडगांव तालुक्यात जानेवारी ते मार्च महिन्यात रोजगार हमी अंतर्गत वेगवेगळी कामे करण्यात आली परंतु अजूनपर्यंत काही मजुरांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले नाहीत. त्यामुळे धडगांव तहसिलदार व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले होते. दिनांक,24 -06-2022 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बिरसा फायटर्स धडगांव टिमने पाठपुरावा केला .त्यामुळे रोजगार हमी संबंधीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की ,दिलेल्या निवेदनाचे दखल घेऊन येत्या आठवडय़ात मजुरांच्या खात्यांवर पैसे टाकले जातील . त्यामुळे एक मोठा दिलासा मजुरांना मिळाला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावरा व सागर पावरा उपस्थित होते. धडगांव बिरसा फायटर्स टीमने केलेल्या या कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.बिरसा फायटर्सचे तरूण सगळीकडे जलद गतीने काम करत असल्याने सगळीकडे हेवा केला जात आहे.
0 Comments