*विषय :- विधवा प्रथा बंद करणे व विवाह नोंदणी बंधन कारक करणेबाबत..*
*आपल्या समाजात पतीच्या निधनावर अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, तसेच महिला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे..या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे, तरी आपल्या गावांमध्ये व देशांमध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे . यासंदर्भात गावांमध्ये जनजागृती करणे संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र व देशांमध्ये जनजागृती करण्यात यावे..*
*शासन निर्णय नुकताच झाला आहे तो कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता जिल्हाभरात प्रशासन स्तरावर प्रयत्न करावे व सर्व विधवा महिलांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा कुठेही अपमान होऊ नये याचे आपण सर्वांनी काळजी घेऊन त्यांना योग्य रित्या सन्मान देऊ..*
*तसेच विवाह नोंदणी बंधन कारणे करणेबाबत धुळे जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे विवाह काळे कार्यालय मालकाने त्यांचे कार्यालयात होणारी विवाहाची बुकिंग करतानाच वधू आणि वराकडील सदस्यांना शहराकरिता विवाह निबंधक कार्यालय, ग्रामीण स्तरावर विवाह नोंदणी कार्यालय ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिका, पंचायत अंतर्गत विवाह नोंदणी विभागातून अर्ज फॉर्म भरून कागदपत्राची पूर्तता करूनच विवाह लावावे व त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत चार महिन्यांचे आत कार्यालयात वर्ग करावी अन्यथा दंड आकारण्यात येईल अशा सूचना आपण प्रशासन स्तरावर वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून द्यावा जेणेकरून बालविवाह ही रोखले जातील आणि वधू-वराचे भविष्य ही सुरक्षित होईल...*
*यावेळी ज्योती पावरा,संजीवनी पाटील, रश्मी पवार,सरोज पवार, ज्योती सूर्यवंशी उपस्थित होते.*
*✍🏻 सौ. ज्योती पावरा, धुळे*
*जिल्हा समन्वयक :- यशस्विनी सामाजिक अभियान,धुळे.*
0 Comments