Advertisement

लाखनी:-बसस्थानकावर वृक्षारोपण करताना ग्रीनफ्रेंड्स व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी वृक्षारोपण लावताने



*ग्रीनफ्रेंड्सतर्फे जागतिक पर्यावरण दिन बसस्थानकावर साजरा*

*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा*

लाखनी:-
    ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीतर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम निमित्ताने पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मागील 17 वर्षापासून अविरतपणे घेतले जात आहे.यावर्षी सुद्धा लाखनी बसस्थानकावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
    याच कार्यक्रमात साकोली क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवस निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण कार्यक्रम तालुका काँग्रेस कमिटी तर्फे लाखनी बसस्थानक व जि.प.गांधी विद्यालय येथे घेण्यात आला.जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी यावेळी समजावून दिले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत तालुका कॉंग्रेस लाखनीचे पदाधिकारी ऍड.शफी लद्धानी,राजू निर्वाण,प्राचार्य व माजी न.प.नगरसेवक धनंजय तिरपुडे, विपुल कांबळे,माजी न.पं. नगरसेवक अनिल निर्वाण,सुनंदा धनजोडे,दादू गायधनी,माजी न.प. नगरसेवक भोला उईके, मोहन निर्वाण,लालू गायधनी,महेश निर्वाण,लोकेश गायधनी यांनी साकोली क्षेत्राचे लोकप्रिय आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी बसस्थानकावर तसेच जि.प.गांधी विद्यालय व इतर ठिकाणी 50 विविध प्रजातीचे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला सहकार्य अ. भा. अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा व नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य लाभले.यावेळी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब,अंनिसचे तसेच नेफडोचे पदाधिकारी अशोक वैद्य, दिनकर कालेजवार,दिलीप भैसारे, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, मारोतराव कावळे, अशोक नंदेश्वर,सिद्धेश कालेजवार, बसस्टँड मॉर्निंग योगा ग्रुपचे निसर्गप्रेमी नागरिक ऋषी वंजारी,ज्ञानेश्वर लांडगे,भीमराव गभने, शिवलाल निखाडे,रमेश गभने,सेवक रोडे, रामकृष्ण गिर्हेपुंजे, विनायक कावळे ,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी बोरकर,सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मेश्राम, इत्यादी जण उपस्थित होते. 
  जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाला साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, लाखनी बसस्थानक नियंत्रक भास्कर डहाके,युवा काँग्रेसचे कार्यकर्ते लोकेश गायधने,सुमित मेघराजानी,राजू आसाराम निर्वाण, बसस्थानक सफाई कर्मचारी शैलेश भैसारे व ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments