Advertisement

"कोडीद येथे विशेष कोवीड लसीकरण मोहीम यशस्वी संपन्न.! "

_____________________________________

    कोडीद उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या कोडीद, चाकडू, गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतील व परिसरातील गावातील नागरिकांसाठी "विशेष कोवीड लसीकरण मोहीम" लसीकरण शिबिर (पहिला, दुसरा व बूस्टर डोस) दिनांक २८ जून २०२२ रोजी राबविण्यात आले🙏🏻
    आदरणीय श्रीमती बुवनेश्र्वरी एस. सीईओ मॅडम जिल्हा परिषद धुळे व जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.डॉ.संतोष नवले सरांच्या आदेशान्वये "विशेष कोवीड लसीकरण" अंतर्गत कोरोनाच्या चौथी लाटेची पूर्वतयारी म्हणून शासनाच्या सूचनेनुसार २८ जून २०२२ रोजी कोवीड_१९चे कोवीड लसीकरण आयोजित करण्यात आले.
    ह्यावेळी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ह्यांनी सर्व आरोग्य कर्मचारी ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील, घरातील गावातील, १२वर्षे ते १४ वर्षे व पुढील सर्व वयोगटावरील नागरिकांना माहिती पोहचविण्याचे काम केले व लाभार्थ्यांना लसीकरण स्थळी पहिला, दुसरा व बूस्टर डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना बोलवण्यात आले.

    आदल्या दिवशी दिनांक २७ जून २०२२ रोजी अपेक्षित लाभार्थ्यांची जनजागृती करण्यात आली ह्यासाठी सदर कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, रेशन दुकानदार, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आशा वर्कर, अध्यक्ष व सदस्य महिला बचत गट तसेच कार्यरत इतर कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत संबंधितांची एक बैठक घेऊन कोवीड लसीकरण १००% कसे होईल ह्याची दक्षता घ्यावी अशी सूचना देण्यात आली.
ह्यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी शिरपूर डॉ.राजेंद्र बागुल सर, शिक्षण विस्तार अधिकारी व प्रशासक श्री.एफ.के.गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.डी.पी.बुवा, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.आव्हाड, श्री बी एस बुवा ,वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप वळवी, डॉ.अनंत पावरा, डॉ.हिरा पावरा, डॉ.महेश पावरा आदींनी परिपुर्ण नियोजन करून लसीकरण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
ह्यावेळी कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तकाठी, कार्यक्षेत्रातील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत व उपकेंद्र येणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, अध्यक्ष व सदस्य महिला बचत गट तसेच कार्यरत इतर कर्मचारी ह्यांनी सर्वांनी समन्वयाने लसीकरण यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली व आपले कार्य पार पाडले.

सर्वांचे आभार उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी मानले.

Post a Comment

0 Comments