Advertisement

आदिवासी विद्यार्थीनीचा घातपात की आत्महत्या चौकशी करा असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांची मागणी

 

दोंडाईचा वसतिगृहातील गृहपालावर गुन्हा नोंदवा  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेची मागणी:तहसीलदारांना निवेदन 
शिरपूर ता.२०:दोडाईचा येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहातील सिव्हिल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैशाली वैशाली तापीदास गावित या मुलींच्या आत्महत्येबाबत  चौकशी होऊन बेजबाबदार गृहपालावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेतर्फे करण्यात आली आहे याविषयी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले.
 निवेदनात म्हटले आहे, की दोंडाईचा येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहात  राहून सिव्हिल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैशाली तापीदास गावित आत्महत्येची वसतिगृहातील दुसरी घटना आहे. वैशालीच्या आत्महत्येमुळे वसतिगृहातील मुली  घाबरलेल्या अवस्थेत आहे .वैशालीच्या आत्महत्येमुळे मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला असून, घटनेच्या सखोल चौकशी होऊन गृहपाल व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. जेणे करून परत आत्महत्येसारखे प्रकार होणार नाही.वैशालीच्या आत्महत्येबाबत अनेक शंका निर्माण होत असल्याने असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेचे युवा विभागीय अध्यक्ष एडवोकेट दारासिंग पावरा धुळे ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ पावरा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments