Advertisement

गणोर:- स्वतंत्र सेनानी क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा स्मृतिदिनानिमित्त बिरसा फायटर्स शाखा गणोर तर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले

स्वातंत्र्य सेनानी जननायक क्रांतीसुर्य धरती आंबा भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त बिरसा फायर्टस शाखा गणोर तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आदिवासी वीर बिरसा मुंडा यांच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील अलिहत गावांमध्ये एक सामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडिलांचे नाव सुगना मुंडा असे होते सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती.आदिवासी जमिनीचे मुळ मालक असुनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते अशा या महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन

यावेळी उपस्थित सरपंच विठ्ठल ठाकरे अर्जून चव्हाण जि.प मराठी शाळेचे मुख्याध्यापक चेतन पाटिल, गुलाब पावरा ग्रामसेवक गुलाब गावित बिरसा फायर्टस शाखा अध्यक्ष राहुल रावताळे चंद्रकांत शेल्टे निलेश भामरे, युवराज रावताळे अजित पटले चेतन पटले राकेश भामरे ओंकार शेल्टे महिला अध्यक्ष कविता भामरे अनिता भामरे,ममता वळवी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments