Advertisement

ए.जी हायस्कुल प्रशालेमध्ये विद्याभारती प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

दापोली: दि. १२ जुन २०२२ रोजी दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए. जी हायस्कुल प्रशालेमध्ये इ. १ली ते इ. ८ वीच्या सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन स्वरुपात विद्याभारती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. 

या प्रशिक्षण वर्गामध्ये विद्याभारतीचे कोकण प्रांतमंत्री श्री. संतोष भणगे यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि विद्याभारती वर्गाची कार्यपद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकां समोरील आव्हानांबाबत उपस्थितांशी संवाद साधला.
दापोलीतील ए. जी हायस्कुल, आदरणीय गोपाळ कृष्ण  सोहनी विद्यामंदीर प्रशाला तसेच विद्याभारती बालमंदीर , शिरळ  चिपळुण येथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतला. 

सदर प्रशिक्षण वर्गास दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री. सौरभ बोडस , ए.जी हायस्कुल प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश जोशी , शिक्षक श्रीराम महाजन व श्री. जितेंद्र पाडळकर यांची उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments