लाखांदूर:- झरी उपसा सिंचन योजना सुरू करण्यासंदर्भात अनेक वर्षापासून शेतकरी संघर्ष करीत आहे.मागील 2020 पासून पुन्हा नव्याने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बालू चुन्ने यांनी वारंवार मुंबई जाऊन सबंधित मंत्री महोदय व प्रधान सचिव जल संपदा यांची भेट घेऊन अनेक वर्षापासून लपलेली फाईल बाहेर काढून योजनेला मंजूरी मिळावी म्हणून प्रक्रियेला सुरवात झाली.या करिता जलसंपदा मंत्री यांना खासदार प्रफुल पटेल यांनी आपले पत्र, फोन वरून झरी उपसा सिंचन योजना सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे.
*नहर,खोलीकरण,पाळीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात ग्राम पंचायत ठराव,निवेदन, आणि आता पर्यंत केलेला पाठपुरावा लाखनी येथील नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी खासदार श्री.प्रफुल पटेल यांना दिला आहे. निवेदन देते वेळी सरपंच किशोर मंडाले यांनी प्रफुल पटेल यांना विचारले असता साहेबांनी नक्की करू ती आमची जवाबदारी आहे.असे सांगितले.*
निवेदन देतेवेळी संघर्ष समिती मार्गदर्शक सरपंच किशोर मंडाले, तेजराम ब्राह्मणकर,राकेश राऊत, गोवरधन वंजारी,गोपीनाथ मंडाले उदाराम कन्नाके, शिवचरण कन्नाके रजनीकांत खंडारे,बबन पिलारे,कैलाश रामटेके, हे होते.
0 Comments