Advertisement

*प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद असल्याने आदिवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान*

(वेबसाईट त्वरित सुरू करण्यासाठी बिरसा फायटर्सने प्रकल्प अधिकारी, तळोदा यांची भेट घेऊन निवेदन...)

तळोदा(प्रतिनिधी)प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद असल्याने वसतिगृहात राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे.यासाठी बिरसा फायटर्स संघटनेने प्रकल्प अधिकारी तळोदा यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,शैक्षणिक वर्ष २०२२-२३ हे १५ जूनपासून सुरू होऊन शाळा,महाविद्यालये हे नियमितपणे सुरू आहे.परंतु,जुने व नवीन विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया वेबसाईट बंदचे कारण सांगून जिल्ह्यातील,तालुक्यातील लांबचे जुने वसतिगृह विद्यार्थी इयत्ता ९,१०,१२ वी व इतर वर्गातील विद्यार्थी संबंधित विभागाचा चुकीचा,भोंगळ कारभारामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.१५ जूनपासून शाळा सुरू होणार हे माहिती असतांना,वसतिगृह प्रवेश वेबसाईट आतापर्यंत बंदच का??यावर्षीचे इयत्ता ९,१०,१२वीचे जुनेच वसतिगृह विद्यार्थी.मग,गुणपत्रक,इतर कागदपत्रे घेऊन प्रवेश देण्यास अडचण काय??आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खेळखंडोबा का???वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऐवळी संथ गतीने का??असे प्रश्न संघटनेने निवेदनातून उपस्थित केले आहे.
   आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या प्रवेश निवड प्रक्रियांची यादीही अद्याप लावलेली नाही. संबंधित विभाग विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.वसतिगृह प्रवेश प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.अन्यथा,लवकरच विद्यार्थ्यांसह बिरसा फायटर्स आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा,तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,लक्कडकोट शाखाध्यक्ष संतोष गावीत,मालदा शाखाध्यक्ष हिरामण खर्डे,जेलसिंग पटले,विजय खर्डे,सुरेश वळवी,हिरालाल पावरा, रोमता वळवी,दिनेश वळवी,विनोद वसावे,नोमा वसावे,बालविर वळवी, संदिप वळवी,दीपक वसावे,अरविंद वसावे,केवलसिंग वसावे आदी.बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांच्या सह्या

Post a Comment

0 Comments