Advertisement

लाखनी:-इलेक्टरीक शॉकने गंभीर जखमी व अपंग असलेल्या वानराच्या पिल्लाला जीवदान


सकाळी बसस्थानकावर मॉर्निंग व्यायाम झाल्यानंतर निसर्गमित्र पंकज भिवगडे यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार वानराचा पिल्लू इलेक्टरीक करंट लागून जखमी निपचित अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांना बसस्थानकावर असताना त्याने दिली. अक्षय कहू याने ही माहिती पंकजला दिली होती.त्यानंतर ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी प्रा.अशोक गायधने, अशोक वैद्य सर लगेच पिल्लाचा शोध घेण्यास बसस्थानकाजवळच्या महावितरण कार्यालयाच्या गेटकडे पोहचल्यावर माहिती देणारा अक्षय कहू याने सांगितले की बंदर पिल्लू बहुतेक मृतावस्थेत आहे पण कळप सारखा धावत असल्याने त्याची बॉडी काढता येत नाही आहे. ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यकर्त्यांनी वानर पिल्लूवर उपचार करण्यासाठी मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी मेजर सुभेदार ऋषि वंजारी व खुशाल मेश्राम यांना सुद्धा आवाज दिला. ते पण तत्परतेने आले. वानर पिल्लुचे निरीक्षण केल्यावर तो अर्धवट मृच्छित अवस्थेत डोरले हॉटेलच्या वर असलेल्या हिरव्या नेट जाळीवर पडलेला आहे असे दिसून आले.त्यानंतर ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी प्राअशोक गायधने,अशोक वैद्य, अक्षय कहू यांचे प्रयत्न बंदराच्या पिल्लाला खाली आणण्यासाठी सुरु झाले.दरम्यान आक्रमक बंदराचा कळप अंगावर चवताळून धावत असताना सुद्धा त्याला पाणी पाजणे सुद्धा सुरू होते.सुरवातीला शॉक बसल्याने त्याला काही दिसत नव्हते,पण पाणी मिळाल्यावर त्याला थोडे चैतन्य आल्यामुळे खाली काढण्यात आले.त्यानंतर बंदराचा कळप जवळ येऊ देण्यासाठी सर्वजण दूर झाले.वानराच्या कळपातील वानरे जवळ येऊन चेहऱ्याला हात लावीत होते पण पिल्लु काहीच हालचाल न करीत असल्याने व डोळे न उघडत असल्याने ते पुन्हा वापस गेले.मग सर्व नेचर क्लब तसेच मानव सेवा मंडळाचे कार्यकर्ते पुन्हा जवळ गेले.अक्षय कहूने त्याला थोपटले,थोपटल्याबरोबर पिल्लू त्याच्या जवळ येवुन त्याच्या पायाजवळ बिलगला.हया बंदराचा एक हात पहिलेपासून तुटलेला म्हणजे अपंग होता.त्यानंतर मेजर सुभेदार ऋषी वंजारी यांनी आपला एमबीबीएस मुलगा डॉ.हितेश वंजारी याला घरून घेऊन आले.दरम्यान बसस्थानकावर असलेले ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी मंगलजी खांडेकर,मारोतराव कावळे, अशोकजी नंदेश्वर हे सुद्धा मदतीला आले.सोबतच बसस्थानकावरील हॉटेल,पानठेला व्यावसायिक,महावितरण विद्युत मंडळाचे रोजंदारी कामगार सुद्धा मदतीला येऊन कळपाच्या बाकी त्रास देणाऱ्या आक्रमक वानराना हाकलण्याचे काम करीत होते.अक्षय कहू याचे बंदराला जवळ घेऊन थोपटणे, मानसिक आधार देणे सुरूच होते.डॉ हितेश वंजारी यांचे सुध्दा प्रथमोपचार सुरू होते.हळूहळू त्याचा शॉक कमी होऊन तो स्वस्थ हालचाल करायला लागला,त्याच्या भाजलेल्या भागाच्या वेदना सुद्धा कमी व्हायला लागल्या.त्यानंतर वनविभागाला सूचना देण्यात आली. त्यांचे वनकर्मचारी येईपर्यंत पुन्हा वानराच्या पिल्लुला मोकळ्या जागेत त्यांचा कळप स्वीकारून नेतो का हे पहायचे ठरविण्यात आले. अक्षय कहूने मोकळ्या जागी ठेवल्यानंतर तो मिनिटभर स्तब्ध राहिला नंतर मात्र पिल्लू टणाटण उडया मारीत इकडून तिकडे धावायला लागला व त्याच्यामागे कळप सुद्धा त्याचबरोबर धावायला लागून ते त्याला बाहेरच्या परिसरात घेऊन गेले.अशाप्रकारे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी (जि.भंडारा)व मानव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र प्रयत्न केल्यामुळे व अक्षय कहूच्या प्रेमळ ,ममतापूर्ण स्पर्शाने एका जखमी वानर पिल्लुचे प्राण आज एक तासाची अखंड मेहनतीने वाचविता आले. अक्षरशः त्याला मृत्यरूपी यमाच्या दारातून बाहेर काढण्यात आले.याकरिता बसस्थानकावर असलेलेल्या अनेकांनी सहकार्य केले.यामध्ये बसस्थानकावरील पानठेला व्यावसायिक ,महावितरण रोजंदारी कर्मचारी यांचे सुद्धा सहकार्य विशेषतः लाभले. शॉक लागलेल्या वानराच्या पिल्लाचे प्राण वाचवून त्याच्या कळपासोबत गाठभेट करवून निसर्गसेवा घडविता आली याचे आंतरिक समाधानाचे भाव सर्वांच्या डोळ्यात व चेहऱ्यावर होते.

Post a Comment

0 Comments