Advertisement

मानव सेवा मंडळ व ग्रीनफ्रेंड्स तर्फे जागतिक योगा दिन साजरा



*विविध योगासने, व्यायाम ,लष्करी कवायत तसेच नृत्यव्यायामाचा अनोखा उपक्रम*

लाखनी:-
    लाखनी बसस्थानकावर पहाटे सकाळी फिरणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी मानव सेवा मंडळाची स्थापना केली तसेच लाखनी बसस्थानकावर 'नेचर पार्क'ची निर्मिती करणारे व विविध निसर्ग-पर्यावरण विषयक कार्यक्रम मागील 17 वर्षांपासून अविरतपणे राबविणारे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब यांचे सयूंक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिन विविध उपक्रमाने लाखनी बसस्थानकावर तसेच मेमन हॉल मध्ये साजरा करण्यात आला.
  यावेळी विविध योगासने,व्यायाम    
तसेच लष्करी पद्धतीने शिस्तबद्ध कवायत आणि नृत्याद्वारे व्यायाम हे प्रकार सेवानिवृत्त मेजर कृषी वंजारी,ज्ञानेश्वर लांडगे,सेवानिवृत्त माजी सैनिक संदिप मेश्राम यांच्याद्वारा सर्व सहभागी नागरिकांना शिकविण्यात आले. सर्व प्रकारचे योगा शरीराला सुदृढ करतात पण नृत्यप्रकारातून योगा व व्यायामाद्वारे अनेक चिंता, व्याधी दूर राहून मन चित्त प्रसन्न व प्रफुल्लित होते त्याच बरोबरच लष्करी पद्धतीने कवायत केल्याने जीवनात शिस्त तसेच तत्परता या गुणांचा विकास होतो याकरिता लाखनी बसस्थानकावर नेचर पार्क मध्ये दररोज हे उपक्रम घेतले जातात . विविध प्रकारची योगासने व व्यायाम प्रकार शिकवून झाल्यानंतर अनोखा असा नृत्यव्यायाम सुद्धा निसर्गरम्य वातावरणात संगीताच्या तालावर दररोज लाखनी बसस्थानकावर घेण्यात येतो. यानंतर सर्वांना पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेची निगा राखण्यासाठी दररोज प्रार्थना करवून त्यांच्याकडून 
 निर्धार व्यक्त केला जातो. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त औचित्य साधुन सेवानिवृत्त माजी सैनिक संदीप मेश्राम, सेवानिवृत्त वनक्षेत्राधिकारी वसंत मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते भीमराव गभने,ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने,मारोतराव कावळे,सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोपाळ बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त मेजर कृषी वंजारी तर आभार प्रदर्शन शिवलाल निखाडे यांनी केले.कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मानव सेवा मंडळाचे सक्रिय पदाधिकारी खुशालचंद्र मेश्राम, शफी लद्धानी,रमेश गभने,ज्ञानेश्वर गिर्हेपुंजे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक भांडारकर,सुनील खेडीकर,सेवक रोडे,डॉ. इलमकर ,मटाले,मेजर सुभेदार बोरकर,तारांचंद गिर्हेपुंजे, अशोक हलमारे,नरेश इलमकर,यशवंत कांबळे, पी.जी. वंजारी, ग्रीनफ्रेंड्सचे अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर,रमेश पालांदुरकर, इत्यादींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments