Advertisement

जातीभेद करणा-या शाळेची मान्यता रद्द करा व दोषींवर कडक कारवाई करा,बिरसा फायटर्सची मागणी

नाशिक:11 वी तील 23 आदिवासी विद्यार्थ्यीनींना वेगळे बसवत जाणीवपूर्वक नापास करणा-या नाशिक येथील भोसला मिलीटरी स्कूलची मान्यता रद्द करून दोषींवर कडक कारवाई करावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,आदिवासी विकास मंत्री,जिल्हाधिकारी नाशिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन राजेंद्र पाडवी महासचिव महाराष्ट्र, गणेश खर्डे कार्याध्यक्ष नंदुरबार, जालिंदर पावरा प्रसिद्धीप्रमुख नंदुरबार, भरत पावरा जिल्हाध्यक्ष नंदुरबार, विजय सहारे कार्याध्यक्ष नाशिक यांनी सुद्धा शासनास पाठविले आहे.
               निवेदनात म्हटले आहे की, सादर करण्यात येते की,नाशिक येथील नामांकित भोसला मिलीटरी गर्ल्स स्कूल मध्ये जातीभेद करत 11 वी तील 23 आदिवासी विद्यार्थ्यीनींना स्वतंत्र वर्गाच्या तुकडीत बसवले जायचे व या 23 आदिवासी विद्यार्थ्यीनींना जाणीवपूर्वक परिक्षेत नापास करण्यात आले आहे,असा धक्कादायक आरोप सबंधित विद्यार्थ्यीनींनी केला आहे.
               कोरोना पाश्र्वभूमीवर दहावीचा अभ्यासक्रम 25% कमी करण्यात आला होता व ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना नापास करू नये,असा आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिला होता.असे असताना 10 वीत 60 ते 75% मिळविणा-या आदिवासी मुलींना नापास करण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर या विद्यार्थ्यीनींना 11 वी नापास झाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा देण्यात आले आहे,असा आरोप सबंधित मुलींनी केला आहे.
             महोदय, पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर सुद्धा शाळेत असा जातीभेद केला जात आहे,ही एक लाजीरवाणी बाब आहे.सदर घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.या घटनेमुळे आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.म्हणून या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात यावी तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,हीच नम्र विनंती .अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments