Advertisement

बुड बुड" बंद करा,सर्वसामान्यांना होतोय त्रास


दापोली: सध्या गावांच्या व शहरांच्या गल्लीत "बुड बुड" करणाऱ्यां गाड्यांची संख्या वाढली आहे.चालकांना ह्या बुलेट गाड्या चालवायला मजा येत असली,तरी बुड बुडच्या मोठ्या आवाजाचा सर्वसामान्य माणसांना त्रास होऊ लागला आहे. काही बुलेट गाड्यां तर आवाजाबरोबरच अधिक धूर सोडताना दिसतात.बिघाड झालेल्या गाड्यां तर अधिक आवाज करतात.2 ते 5 सेकंदही हा आवाज नको वाटतो. बुड बुड हा आवाज ऐकूनच काने बहीरे होण्याची वेळ आली आहे. बुड बुड वाल्यांना ह्या गाड्यां रोज चालवतांना यांच्या कानांवर काही परीणाम होतो की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. 
              2 ते 5 लाख किंमतीच्या ह्या महागड्या बुलेट गाड्यांचा आवाज सर्वसामान्य लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आपली ऐपत वाढावी,आपल्या गाडीकडे लोकांनी लक्ष द्यावे,आपली गाडी ही इतरांपेक्षा वेगळी आहे या हेतुने ह्या गाड्या खरेदी केल्या जात असाव्यात. 
         बहुतेकदा हे गाड्यां चालवणारे गर्दीत येऊनच गाडीचा अधिक आवाज करतात, काही तरूण तर गर्दीतून सुद्धा शायनिंग मारत 100 च्या स्पीडने गाडी चालवतात. डोक्यावर हेल्मेट नाही,चालू गाडीवर सेल्फी काढणे,दिवसा गाडीचे लाईट चालू ठेवणे,पुढच्या गाड्यांना ओव्हर टेक करुन जाणे यामुळे काहींची गाडी चालवायचीच शिस्त बिघडली आहे.काही तरुण ह्या गाड्या वाहतुकीचे नियम मोडत गाडी वाकडी तिकडी, आडवी तिडवी करत गर्दीतून चालवतांना दिसतात.कमी आवाज करणाऱ्यां बुलेट गाड्यांचा आम्हास विरोध नाही,परंतु मोठा आवाज करणाऱ्या गाड्यांचा नक्कीच विरोध आहे.बुलेट गाड्या  तयार करणा-या कंपन्यांनी सुद्धा कमी आवाज करणा-या व ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाहीत, अशा गाड्या बनवल्या पाहिजेत. ग्राहकांनी सुद्धा कमी आवाज करणाऱ्यां बुलेट गाड्यां विकत घ्याव्यात.आपल्या गाड्यांमुळे सर्वसामान्य माणसांना त्रास होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजेत.ह्या बुलेट गाड्यांच्या आवाजावर नियंत्रण नाही ठेवले गेले तर येत्या काळात चालवणारे चालकच नाहीतर गाड्यांचा आवाज ऐकणारे सुद्धा कानाने बहिरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी चिंता  समाजसेवक तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments