Advertisement

"सुशिलकुमार पावरा नाव ऐकून भिती वाटते",निवेदन घेताना अधिकारी घाबरले


*त्या आदिवासींना पाणीही नाही*

*गटविकास अधिकारी दापोली यांना बिरसा फायटर्सचे निवेदन*
        
*पावसाचे व नाल्याचे पाणी पित आहेत आदिवासी*

दापोली:स्मशानभूमीसाठी संघर्ष करत असलेल्या जामगे ग्रामपंचायतमधील नवानगर कातकरवाडी  व कातकरवाडी या दोन वाडीसाठी आदिवासी बांधवांना पाण्याचीही सोय नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जामगे गावातील आदिवासी बांधवांचा स्मशानभूमीचा विषय ताजा असतानाच पाण्याचाही गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना सांगून दाखवला.त्यानंतर लगेच निवेदन तयार करून जामगे येथील  ग्रामस्थांनी तहसिल कार्यालय दापोली येथून आपला मोर्चा गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोलीकडे वळवला. जामगे येथील आदिवासी  बांधवांना पाण्याची व्यवस्था करा,अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी दापोली यांना बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देण्यात आले.यावेळी जामगे गावातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
               निवेदनात म्हटले आहे की, जामगे ग्रामपंचायत हद्दीतील नवानगर कातकरवाडी -आदिवासीवाडी व कातकरवाडी या दोन वाड्यांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे.15 व्या वित्त योजना 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बोअरवेल खणून पाणीपुरवठा केला जात होता.परंतु बोअरवेल बंद असल्यामुळे लोक पावसाचे पाणी व नदी नाल्यातील दूषित पाणी पित आहेत, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणून या दोन आदिवासी वाडीसाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली.
         गटविकास अधिकारी आर एम दिघे व सहायक गटविकास अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे उपस्थित अधिकारी हे निवेदन घेण्यास घाबरत होते.सुशिलकुमार पावरा हे नाव ऐकून आम्हाला भिती वाटते,असे संबंधित अधिकारी बोलले. पावरा यांनी संबंधित अधिका-यांची समजूत घातल्यानंतर निवेदन घेण्यास तयार झाले.कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, अशी घोषणा पंचायत समिती आवारात देण्यात आल्या.पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी हे टक लावून बघत होते.

Post a Comment

0 Comments