Advertisement

मेकॅनिकलने फसविल्याची पोलीस ठाण्यात तक्रार

*वाद विकोपाला,पोलिसांची मध्यस्थी*

दापोली: दापोली येथील श्री.विघ्नहर्ता टु व्हीलर स्पेअर्स अँड पार्ट जालगांव या गॅरेज मध्ये सुशिलकुमार पावरा यांनी आपली "अँक्टीव्हा थ्री जी " गाडी दुरूस्तीसाठी दिनांक 10 जुन 2022 रोजी दिलेली होती.गॅरेजचे मेकॅनिकल पप्या जोशी यांनी गाडी दोन दिवस दुरूस्तीला लागेल,असे म्हणत दिनांक 18 जून पर्यंत 9 दिवस ठेवली.गाडी दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य मेकॅनिकलच्या सांगण्याप्रमाणे सुशिलकुमार पावरा यांनी दुकानातून विकत आणून दिले.श्री श्रद्धाऑटोमोबाईल्स दापोली या दुकानातून साहित्य का आणले ? तो आम्हास कमीशन देत नाही. आता मी ही गाडी दुरुस्त करत नाही म्हणत पूर्ण खोललेली गाडी मेकॅनिकलने दुरुस्त करून न देेण्याबाबत वाद केला. म्हणून गाडीमालक सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस ठाणे दापोली येथे दिनांक 16 जून 2022 रोजी येऊन तक्रार सांगितली.तक्रारीची दखल घेत पोलीस अंमलदार नलावडे यांनी संबंधित मेकॅनिकलला बोलावून चौकशी केली व तक्रारीत तथ्य दिसून आल्यामुळे अंंमलदार नलावडे यांच्या सांगण्यावरून मेकॅनिकलने गाडी दुरुस्त करून देण्याची हमी दिली. मेकॅनिकलने पुन्हा दोन दिवस गाडी गॅरेजमध्ये ठेवली. गाडी दुरुस्त झाल्याचे सांगून एकूण रक्कम सोळाशे साठ रूपये घेतले.मेकॅनिकलची मजुरी व गाडी साहित्याचा खर्च धरून सहा हजार पेक्षा अधिक खर्च झाला. 
                 गाडी दुरुस्त करूनही गाडीतून ऑइल सारखं गळत असल्यामुळे व इतर बिघाड दिसून आल्यामुळे लगेच मेकॅनिकलला पावरा यांनी गाडी दाखविली.तेव्हा ही गाडी चालवू नका,पुन्हा दोन दिवस दुरुस्तीसाठी माझ्याकडे ठेवा,असे मेकॅनिकलने सांगितले.एवढे नऊ दिवस गाडी गॅरेज मध्ये ठेवून व पैसे घेऊन पुन्हा दोन दिवस गाडी ठेवण्यास सांगत असल्यामुळे आपली जाणीवपूर्वक हा मेकॅनिकल फसवणूक करीत असल्याचे पावरा यांना लक्षात आले. म्हणून माझी गॅरेजवाल्यानी फसवणूक केली असल्याची तक्रार घेऊन सुशिलकुमार पावरा हे दिनांक 23 जून रोजी पोलीस ठाणे दापोली येथे आले.यावर ठाणे अंमलदार पवार यांना मेकॅनिकल पप्या जोशी यांना ताबडतोब पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.पोलीसांच्या मध्यस्थीने यापुढे येणारा दुरुस्तीचा जो काही खर्च येईल. तो खर्च मेकॅनिकल पप्या जोशी हे देणार असल्याचे सांगितले.या अटीवर गाडीमालक सुशिलकुमार पावरा यांनी राज ऑटो गॅरेज मेकॅनिकल मांडवकर यांच्याकडे गाडी दुरुस्तीला दिली आहे.मेकॅनिकलने पुन्हा गाडी पूर्ण खोलून दुरुस्ती कामाला घेतली आहे.गाडी बंद अवस्थेत आहे.याबाबत ग्राहक मंच,ग्राहक संरक्षण संस्थांकडे तक्रार देणार असल्याचे पावरा यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments