Advertisement

कोडीद येथे भगवान बिरसा मुंडा स्मृति दिनानिमित्त आज अभिवादन व पूजन करण्यात आले



    संपूर्ण आदिवासी समाजात एकत्वाची व आत्मसम्मानाची भावना निर्माण करणारे इंग्रजांविरुद्धच्या "ऊलगुलान" आंदोलनाचे प्रणेते क्रांतिसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा ९ जून हा स्मृतीदिन संपूर्ण भारतात जगात सर्वत्र साजरा करण्यात येतो.
    याच दिवशी भगवान बिरसा मुंडानी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्युचे गूढ अद्याप कायम आहे.
हा स्मृतीदिन प्रत्येक ग्रामपंचायत, गावात, पाड्यावर धरती आबा बिरसा मुंडा ह्यांचे अभिवादन करावे ही संकल्पना ठेऊन आज कोडीद येथे स्मृतिदिनानिमित्त कोड़ीद ता.शिरपुर येथे भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले अभिवादन करण्यात आले.
    ह्यानिमित्त कोडिद पंचक्रोशितील समाजबांधव व युवा उपस्थित होते
प्रमुख उपस्थिती म्हणून गावाचे पोलीस पाटील श्री.भरत पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, पंचायत समिती सदस्य कांतीलाल पावरा, शब्बीर पावरा सर, मंजा पावरा, संभु पावरा, टेट्या पावरा, मुन्ना बिऱ्हाडे, रोहिदास पावरा, आबा डीवरे सर, सुनील सोनवणे, विनोद पावरा, संजय पावरा, अशोक पावरा, कैलास सोनवणे, रतन पावरा, अजय पावरा, लखन पावरा, संजू भिल, प्रवीण कोकणी, व गावातील युवा व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments