Advertisement

बिरसा फायटर्सच्या निवेदनांची मंत्री व प्रशासन घेत आहेत दखल

*अहमदनगर:- बेघर 122 आदिवासी कुटुंबांना न्याय मिळेल: सुशिलकुमार पावरा*

रत्नागिरी:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा रस्तापूर येथील बेघर झालेल्या 122 आदिवासी कुटुंबांना तातडीने घरकुल व जमीन मिळावी या मागणीच्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना दिलेल्या पत्राची तात्काळ पूर्तता करणेबाबतचे सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी विशेष कार्यकारी अधिकारी ,महसूल विभाग, मंत्रालय मुंबई यांना दिनांक 10/05/2022 रोजी निवेदन दिले होते.त्या निवेदनाची मंत्रालयात दखल घेतली गेली असून महसूल विभाग मंत्रालयाच्या निवेदनाचा संदर्भ देऊन सुनिता ज-हाड तहसीलदार भूसुधार अपर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी तहसीलदार राहाता जिल्हा अहमदनगर यांना चौकशी करून नियमोचित कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल बिरसा फायटर्स संघटनेस कळवावा,असे एक पत्र दिले आहे.
          पुणतांबा रस्तापूर येथील 122 बेघर आदिवासी कुटुंबांना जमिन व घरकुले मिळावीत,म्हणून बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयासमोर उपोषण व आंदोलन केले होते.त्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी महसूल विभाग मंत्रालय मुंबई यांना तातडीने पत्र दिले होते.त्या पत्रांचा योग्य पाठपुरावा बिरसा फायटर्स संघटना करीत आहे.त्यामुळे या 122 बेघर आदिवासी कुटुंबांना लवकरच न्याय मिळेल, अशी आशा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments