Advertisement

आदिवासी विद्यार्थीनीचा घातपात की आत्महत्या?

*बिरसा फायटर्सची सखोल चौकशीची मागणी*

*पोलीस निरीक्षक विसरवाडी यांना निवेदन* 

नवापूर:दोंडाईचा येथील शासकीय वसतिगृहातील वैशाली तापीदास गावीत या विद्यार्थ्यीनीची आत्महत्या की घातपात याची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी बिरसा फायटर्सचे नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी यांनी पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक विसरवाडी यांना देण्यात आले.याचबरोबर या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, गणेश खर्डे नंदुरबार कार्याध्यक्ष, जालिंदर पावरा नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख,राजेंद्र पाडवी महासचिव यांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे केली आहे.
                     निवेदनात म्हटले आहे की, दोंडाईचा येथील शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यीनी वैशाली तापीदास गावीत हिच्याबाबतीत तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला,असा संशयास्पद प्रकार घडला आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत वसतिगृहाचे गृहपाल किंवा वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते,म्हणून संताप व्यक्त केला जात आहे.
      वैशाली तापीदास गावीत ही विद्यार्थ्यीनी मुळ गाव पिंपळे पोस्ट खडकी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील आहे.ती दोंडाईचा येथील पाॅलीटेक्नीकल काॅलेज मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग च्या प्रथम वर्षांची परीक्षा देत होती. तिने आपल्या रुममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घडफास घेऊन आत्महत्या केली आहे,अशी माहीती तेथील लिपीक कैलास धनगर यांनी गृहपाल यांना दिली,परंतु गृहपाल धुळे येथे गेल्यामुळे उशिरापर्यंत घटनास्थळी आले नाहीत, असे वृत्त समजते.तसेच पालक वसतिगृहात आल्यावर मुलीचे प्रेत खाली जमिनीवर होते, पालकांचे म्हणणे आहे. पोलीसांंनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून सोबतच्या मुलींचे जवाब घेऊन वसतिगृह सील केल्याचे कळते. त्यामुळे वैशाली गावीत हिच्याबाबतीत आत्महत्या की घातपात केला गेला? अशी शंका निर्माण होत आहे,म्हणून सदर घटनेची सखोल चौकशी करून कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करून कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments