Advertisement

आदिवासी कामाठी व स्वयंपाकी यांच्यावर अन्याय करणाऱ्यांची चौकशी करा,बिरसा फायटर्सची मागणी


*शासकीय आश्रमशाळा चुलवड येथील अन्यायग्रस्त आदिवासी कामाठी व स्वयंपाकी यांचे थकित मानधन तात्काळ देण्याची मागणी*

धडगांव: शासकीय आश्रम शाळा चुलवड येथील आदिवासी कामाठी व स्वयंपाकी यांच्यावर नेमणूक आदेश व  खकीत मानधनासंबंधात अन्याय करणा-या संबंधित अधिकारी व मुख्याध्यापक यांची चौकशी करून कर्मचा-यांना तात्काळ मानधन मिळावे,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष व भरत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                   निवेदनात म्हटले आहे की, शासकीय आश्रम शाळा चूलवड ता.धडगाव जिल्हा नंदुरबार येथील अन्याय ग्रस्त श्री.विजय वळवी  कामाठी व श्रीम.सुकाबाई वळवी स्वयंपाकी यांचा दिनांक 6/6/2022 रोजी तक्रार अर्ज संघटनेस प्राप्त झाला आहे.संबंधित अन्याय ग्रस्त कर्मचारी यांनी मा.प्रकल्प अधिकारी तळोदा यांना दिनांक 8/2/2022 व 2/3/2022 रोजी आपले थकित मानधन मिळणेबाबत अर्ज केलेला आहे.तरी सदर कर्मचा-यांकडून शाळेत काम करवून घेऊन अद्यापही मानधन देत नसल्याची तक्रार आहे.तसेच सदर कर्मचा-यांना थकित मानधन न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे.श्रीम.सुकाबाई वळवी स्वयंपाकी या महिलेस सुद्धा थकित मानधन देण्यात आले नाही.सदर विधवा आदिवासी महिलेस सन 2003 पासून बदलीचे कारण सांगून चूलवड येथून मांडवी व मांडवीहून पुन्हा हुंडा रोषमाळ व पुन्हा चूलवड आश्रम शाळेत हेलपाटे घालायला लावत शाळेत राबवून घेतले आहे.श्रीम.सुकाबाई वळवी स्वयंपाकी यांना शाळेत काम करवून घेतले व प्रत्यक्षात मात्र नेमणूक आदेश दुस-यांच्या नावाने काढले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.विधवा महिलेकडून काम करवून घेऊन आदेश दुस-यांच्या नावाने काढणे,जाणीवपूर्वक मानधन न देणे,मानधन रखडवून  ठेवणे इत्यादी आरोप शाळेतील मुख्याध्यापक श्री.सायसिंग वसावे यांच्यावर करण्यात आले आहेत. तसेच शाळेतील एकूण 10 ते 15  कंत्राटी कामाठी व स्वयंपाकी इत्यादी कर्मचा-यांच्या नेमणूक आदेश व थकित मानधन याबाबत चौकशी अहवाल  निरीक्षक श्री.अखडमल हे वरिष्ठांपर्यंत पाठवत नसल्याची शंका उपस्थित केली जात आहे. एकंदरीत शाळेतील मुख्याध्यापक व निरीक्षक यांच्या कामातील बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा ,निष्काळजीपणामुळे थकित मानधन आपल्याला अद्याप मिळाले नाही,अशी संबंधित अन्याय ग्रस्त कामाठी व स्वयंपाकी यांची तक्रार आहे.म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व अन्याय ग्रस्त कामाठी व स्वयंपाकी यांचे थकित मानधन तात्काळ देण्यात यावे व सदर कर्मचा-यांना शाळेत कामावर पुन्हा घेण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने प्रकल्प अधिकारी तळोदा यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments