Advertisement

आदिवासींना स्वतंत्र धर्म कोड मिळावा:बिरसा फायटर्सची मागणी


*राष्ट्रपती,पंतप्रधान यांना तहसीलदार दापोली मार्फत निवेदन* 

*आदिवासी हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन नाहीत: सुशिलकुमार पावरा*

दापोली:आदिवासींना स्वतंत्र धर्म कोड मिळावा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले.
              निवेदनात म्हटले आहे की,  आदिवासी हे हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य धर्माचे नाहीत. आदिवासी हे निसर्गपूजक आहेत.वाघदेव, बापदेव,डोंग-यादेव,वृक्ष, प्राणी,जल ,जंगल, जमीन इत्यादी निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा करत होते व ते आजही निसर्गाची पूजा करतात. आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र व विशिष्ट आहे. आदिवासींची संस्कृती कुठल्याही धर्माची मिळतीजुळती नाही.आदिवासींच्या रूढी,परंपरा,रितीरिवाज,भाषा,पोशाख, जीवनशैली इत्यादी स्वतंत्र आहेत. आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व आहे,एक वेगळी ओळख आहे.इंग्रजांच्या काळात भारतीय जनगणनेत आदिवासींसाठी ओबाजिनीज, अॅ नामिस्ट ,ट्रायबल म्हणून ओळखल जात होतं.स्वातंत्र्यानंतर भारतीय जनगणनेत आदिवासींचं अस्तित्व दाबण्यात आलं.आदिवासींना विविध धर्मात गुतवण्यात आलं,काहींना धर्मांतरीत करण्यात आलं.सध्याची प्रशासकीय व्यवस्था आणि मनुवादी राजकीय प्रवृत्तीची लोक आदिवासींना हिंदू ठरवू पाहत आहेत.मात्र आम्ही आदिवासी हिंदू नाहीत. आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत.
                     मा.सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा "आदिवासी हे हिंदू नाहीत" असा निर्णय दिला आहे.त्यामुळे आमच्या आदिवासींकरिता स्वतंत्र धर्म कोड जाहीर करावा.सन 2022 मध्ये होणा-या जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र धर्म कोड काॅलम 7 जाहीर करण्यात यावा.काही मनुवादी विचारसरणीची लोक आदिवासींना जबरदस्तीने हिंदू बनवत आहेत. वनवासी म्हणून उल्लेख करत आहेत. आदिवासी हे वनवासी नाहीत, तर मूलनिवासी आहेत. या देशाचा खरा मालक आदिवासी आहे.या धरतीचा खरा पुत्र आदिवासी आहे.तरीही मनुवादी विचार सरणीची काही लोक आदिवासींना हिंदू बनवत आदिवासींचे अस्तित्व संपविण्यासाठी कटकारस्थान करीत आहेत. हे कटकारस्थान रोखण्यासाठी आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी धर्म  काॅलम 7 जाहीर करावा.अन्यथा नाईलाजाने संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.याची नोंद घ्यावी,असा आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
          या विषयावर चर्चा करण्यासाठी दिनांक 5 जून रोजी बोधीवृक्ष परिसर शहादा जिल्हा नंदुरबार येथे सर्व आदिवासी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बिरसा फायटर्स,सातपुडा पावरा बारेला समाज संघटना, आदिवासी एकता परिषद, एकलव्य संघटना,आदिवासी महासंघ,आदिवासी शिक्षक संघटना,शबरीमाता भिल्ल समाज संघटना इत्यादी आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी यांनी बैठकीत सहभाग नोंदवला होता.सभेत सुशिलकुमार पावरा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.आदिवासींना स्वतंत्र धर्म कोड देण्यात यावा,अशा मागणीचा एक सूर सर्व आदिवासी संघटनांनी धरला आहे.

Post a Comment

0 Comments