महानायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बिरसा क्रांती दल व्दारा आयोजित * आदिवासी सन्मान परिषद गुरुवार दिनांक ९ जुन २०२२ यवतमाळ येथे आहे .आदिवासी समुदायांनी आपल्या आत्मसन्मानासाठी अधिक जागृत राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक बाजुंनी आदिवासींच्या विरुध्द षडयंत्र सुरु झाले आहे. काही षडयंत्र दृष्य आहे तर काही अदृष्य. जर ही सनातनी षडयंत्र यशस्वी झाली तर आदिवासी समुदाय येणाऱ्या काळात आपला सन्मान गमावून गुलामीच्या पथावर अग्रेसीत होईल. अशी भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिरसा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी कामाला लागले आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रत्येक आदिवासी गावातुन पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे या साठी गाव तिथे बैठका आयोजित करण्यात येत आहे. सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांनी संघटनेच्या युनिफॉमवर कार्यक्रमाला उपस्थित रहाने आवश्यक असल्यामुळे सर्व महिला भगीनींनी व पुरुष बांधवांनी युनिफॉम बुक केला आहे. याचाच एक भाग म्हणून उमरखेड तालुक्यात आज एकाच
दिवशी तीन ठिकाणी बेठका घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिरसा. क्रांती दल महिला फोरम उमरखेड च्या सचिव विमल फोले, संगिता वाळके, रत्नमाला बुरकुले, पुनम माहूरे, शकुंतला देवकर, सुनिता शिरडे, रंजिता खोकले,करुनाताई बेले, पुष्पाताई नाटकर, आशा माहूरे, आशा ढोले, रेखा खंदारे, जोती गारोळे उपस्थित होते. उमरखेड, वांगी,मरसुळ दत्तनगर या ठिकाणी मोठ्या जर संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments