Advertisement

सापडलेल्या पाणदिवड सापाच्या अंड्यांची ग्रीनफ्रेंड्सने केली कृत्रिम पद्धतीने पैदास


*9 पाणदिवडच्या पिल्लांना केले निसर्गात मुक्त*

*ग्रीनफ्रेंड्सचा  विवेक बावनकुळेचा "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनी" उत्कृष्ट प्रयत्न*

एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईघर 47 न्युज 
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय पञकार संघ (भारत सरकार
मान्य प्राप्त ) प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ प्रांत . 

लाखनी:-
    ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सरीसृप संशोधक , सर्पमित्र विवेक बावनकुळे व मनीष बावनकुळे यांना लाखनी येथील निर्वाण मोहल्यात हरिश्चंद्र आंबिलकर यांच्या घरी साप असल्याचा निरोप एप्रिल महिन्यात मिळाला. हे दोघेही त्याठिकाणी तात्काळ तिथे पोहचले असता त्यांना बिनविषारी जातीचा "पाणदिवड" साप (इंग्रजी नाव चेकर्ड किल बॅक व ग्रामीण भागात 'धोंड्या'साप असे नाव आहे) आढळला. विटेच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या सापाला ताब्यात घेतल्यावर त्यांना त्याच ठिकाणी खाली 9 अंडी सुद्धा आढळली. त्यांनी सापाला सुरक्षित सोडल्यानंतर विवेक व मनिषने अंडी फेकून देण्याऐवजी त्यांची कृत्रिम पद्धतीने पैदास करून अंडी उबविन्याकरिता प्रयत्न सुरू केले.अंडी एकदम सुरक्षितरित्या व न हलविता उचलल्यावर त्यांनी वरच्या बाजूला मार्किंग केले.विवेकने स्वतःच्या घरी बरणीमध्ये वर्मीकुलेट माती भिजवून त्यामध्ये अंडे  न हलविता ठेवले.ह्या वर्मीकुलेट मातीमुळे उष्णता आणि आद्रताचे नियंत्रण दररोज  करीत असल्याने 22  दिवसानंतर त्यातून 9 पिल्ले बाहेर पडली. वर्मिकंपोस्ट मध्ये हवा व उष्णता धरून ठेवण्याची क्षमता असल्याने हे कार्य अधिक सुलभ झाले.त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसेच दिशानिर्देश ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने व निसर्गमित्र पंकज भिवगडे,ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य यांच्याकडून  प्राप्त होत होते.अशाप्रकारे 21 दिवसाची विवेक व मनिषची मेहनत फळाला आली.त्यांनी दुसऱ्या दिवशी 9 ही पाणदिवड जातीच्या पिल्लांना सातबंधारे नहराजवळ  सोडले.9 ही लहान  सापांना मे महिन्यात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनी  जीवदान दिले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.याअगोदर सुद्धा विवेकने गडपेंढरी तसेच लाखोरी गावातून आणलेल्या  दोन वेगवेगळ्या घटनेतील जखमी शृंगी घुबडावर (ग्रेट हॉर्नड आउल )यशस्वीपणे उपचार करून जीवदान दिले आहे.त्याचप्रमाणे मागील सहा महिन्यात 2-3जखमी वानरावर ,अजगर विविध जखमी सापावर त्याचप्रमाणे पाणकावळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज,पाणढोकरी असे अनेक पक्षी -प्राण्यांवर मागील दोन वर्षात घरीच उपचार व सुश्रुषा केली आहे व वनविभागाच्या सहकार्याने त्यांना निसर्गात मुक्त सुद्धा केले आहे.त्याचबरोबर पाल ,सरडे,आणि बेडूक,कासव, घोरपड यासारख्या सरपटणारे प्राण्यांवर रात्री सर्व्हे व संशोधन करीत असतो.त्याने "भंडारा जिल्ह्यात चौकोनी नक्षी पाय असलेल्या पालीवर" रिसर्चपेपर गतवर्षी संशोधनपत्रिकेत प्रसिध्द केले आहे.  या निसर्गप्रेमी कार्यामुळेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे विवेक व मनिषला "उत्कृष्ट निसर्गमित्र व सर्पमित्र" पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात आले आहे.;याचबरोबर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी -साकोलीची सर्पमित्र चमू यामध्ये निसर्गमित्र पंकज भिवगडे, युवराज बोबडे,सलाम बेग,मयुर गायधने,दर्वेश दिघोरे,यश तिडके,गोविंदा धुर्वे,रोशन बागडे,रुपेश निर्वाण,आकाश सोनटक्के, आरिफ बेग इत्यादी जण सातत्याने साप, जखमी पक्षी- प्राणी यांची सुरक्षित सुटका करून  हजारो सापांना, पक्षी- प्राण्यांना जीवदान मागील 18 वर्षात दिलेले आहे. त्याबद्द्ल त्यांचेसुद्धा सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments