Advertisement

मसवाणी येथे आदिवासी बांधवांवर झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करा बिरसा क्रांती दल जिल्हाध्यक्ष मालतीताई किन्नाके गोंदिया यांनी केले

       सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा मसवाणी येथे संजय कवाडकर या समाजकंटकाने आदिवासी बांधवांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले,परंतु सदर इसमाला आदिवासी समाज बांधवांनी जाब विचारला असता त्याने जातीवाचक शीविगाळ केले एवढ्यात न था़बता सदर इसमाने आदिवासी महिलावर मिर्ची पावडर फेकले.परंतु मसवाणी येथील महिला पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार करायला गेल्या असता सहाय्यक पो.निरिक्षक व ठाणे अंमलदार यांनी महिलांना उलसुलट सवाल जवाब करून हाकलून लावले. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आमच्या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा क्रांति दलाने पुढाकार घेत संबंधित आरोपीवर अनुसुचित जाती,जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मा.*जिल्हाधिकारी* गोंदिया व मा.*पोलीस अधिक्षक गोंदिया* यांना बिरसा क्रांति दलाच्या जिल्हाध्यक्षा तिरू. मालतीताई किन्नाके* जिल्हा उपाध्यक्षा तिरू.*हेमलताताई आहाके*,सचिव *बिंदूताई कोडवते*,जिल्हा महासचिव *संगिता ताई पुसाम*, *डिलेश्वरीताई मरसकोल्हे*,*शालीनीताई पंधरे*,तिरु.*फागोजी फरदे* संघटक, तिरु.*प्रकाश येलने* तथा बिरसा क्रांती दलाचे सदस्य उपस्थितित निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments